राज्य शासनाचे अपील फेटाळले
By Admin | Updated: December 16, 2014 23:44 IST2014-12-16T23:44:14+5:302014-12-16T23:44:14+5:30
नागपूर : चंद्रपूर सत्र न्यायालयाने हत्याप्रकरणातील एका आरोपीला तो वेडा असल्यामुळे शिक्षा दिली नाही. या निर्णयाविरुद्ध शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवून शासनाचे अपील फेटाळून लावले.

राज्य शासनाचे अपील फेटाळले
न गपूर : चंद्रपूर सत्र न्यायालयाने हत्याप्रकरणातील एका आरोपीला तो वेडा असल्यामुळे शिक्षा दिली नाही. या निर्णयाविरुद्ध शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवून शासनाचे अपील फेटाळून लावले.अमृत यादव चहांदे (५४) असे आरोपीचे नाव असून तो कलेटा, ता. ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथील रहिवासी आहे. मृताचे नाव गौतम होते. तो पत्नी व मुलांसोबत राहात होता. ५ जानेवारी २००३ रोजी गौतम व आरोपीचे कचरा सफाईवरून भांडण झाले. दरम्यान आरोपीने गौतमच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. गौतम रक्ताच्या थारोळ्यात कोसळून ठार झाला. सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरवले, पण त्याला कलम ८४ (वेड्या व्यक्तीचे कृत्य) चा लाभ दिला होता.