शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार ओबीसी आरक्षणावर गंभीर नाही - केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 06:38 IST

जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात तडीस लागत नाही. तोपर्यंत राज्यातील ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू शकत नाही, असेही ते म्हणाले

नवी दिल्ली : राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला ओबीसींचा इम्पिरीकल डाटा उपलब्ध करून दिला नाही. या मुद्यावर राज्य सरकार गंभीर न राहिल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागास वर्गाला (ओबीसी) राजकीय आरक्षणावर पाणी सोडावे लागले, असे रोखठोक मत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले. पंचायत राज मंत्रालयाच्या विविध उपक्रमांबाबत ‘लोकमत’शी बोलताना कपिल पाटील यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

राज्य सरकारने हा मुद्दा कधीच गांभीर्याने घेतला नसल्याचे सांगून पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही ओबीसी आयोग स्थापन करण्याला राज्य सरकारने दीड वर्ष घेतले. यानंतर या आयोगाला आर्थिक तरतूद केली नाही. पहिल्यांदा ५ कोटी रुपये दिले. या सर्व प्रकारातून राज्य सरकार गंभीर नव्हते, हे स्पष्ट होते. आता राज्य सरकारने निवडणुका घेण्याचे अधिकार आपल्याकडे घेतले आहेत. यातून प्रश्न सुटत नाही. कारण जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात तडीस लागत नाही. तोपर्यंत राज्यातील ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू शकत नाही, असेही ते म्हणाले.

मनरेगासाठी निधी कमी नाहीमहाराष्ट्रासाठी मनरेगा योजनेसाठी निधी कमी मिळाल्याचा आरोप खोडून काढून कपिल पाटील म्हणाले की, मनरेगा योजनेसाठी निश्चित निधी नसतो. ज्याप्रमाणे राज्यांकडून मागणी असते त्या प्रमाणात निधी दिला जातो. राज्याच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्राला २,२०० कोटी रुपये मिळाले आहेत. ३५ लाख लोकसंख्या असलेल्या मेघालयाला १,५०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

अमृत सरोवर योजनादेशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ७५ सरोवर (तलाव) तयार करण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेली आहे. यानुसार महाराष्ट्रात ३,६०० अमृत सरोवर तयार केले जाणार आहेत. येत्या एक वर्षात या सरोवरांची निर्मिती होईल, असेही कपिल पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षण