राज्य ग्राहक आयोगाच्या खंडपीठाचे सोमवारी उद्घाटन
By Admin | Updated: March 21, 2015 00:09 IST2015-03-20T22:40:04+5:302015-03-21T00:09:34+5:30
नाशिक : ग्राहक न्यायालये लोकाभिमुख व गतिमान व्हावी यासाठी राज्य सरकारने नाशिकला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे खंडपीठ मंजूर केले आहे़ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ग्राहकांच्या तक्रारींबाबत दिलेल्या निर्णयांविरुद्ध या खंडपीठाकडे अपील दाखल करण्याची तसेच २० लाखांपेक्षा अधिक रकमेचे मूळ अधिकार कक्षेतील दावे या ठिकाणी दाखल करता येणार आहेत़ राज्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आऱ सी़ चव्हाण यांच्या हस्ते या परिक्रमा खंडपीठाचे सोमवारी (दि़२३) उद्घाटन होणार आहे़

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये सोमवारी (दि़२३) रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास हा उद्घाटन समारंभ होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे प्रमुख जिल्हा व न्यायाधीश आनंद कारंजकर असणार आहेत, तर या कार्यक्रमास विभागीय आयुक्त एकनाथ डवले, मनपा आयुक्त प्रवीण गेडाम, राज्य आयोगाचे सदस्य शशिकांत कुलकर्णी, उषा बोरा, उषा ठाकरे, ग्राहक मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे उपस्थित राहणार आहेत़
या उद्घाटनास उपस्थित राहण्याचे आवाहन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे माजी अध्यक्ष ॲड़ जयंत जायभावे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड़ नितीन ठाकरे, ॲड़ अविनाश भिडे, ॲड़ बाळासाहेब आडके,ॲड़ किरण चांदवडकर, ॲड़ सुरेश निफाडे, ॲड़ हेमंत गायकवाड, ॲड़ संजय गिते, ॲड़ दीपक ढिकले, ॲड़ जालिंदर ताडगे, ॲड़ माणिक बोडके, ॲड़ अपर्णा पाटील, ॲड़ मंगला शेजवळ, ॲड़ अतुल लोंढे, ॲड़ अजय निकम, ॲड़ विद्येश नाशिककर आदिंनी केले आहे़ (प्रतिनिधी)
--इन्फो--
महिन्यातून आठ दिवस कामकाज
ग्राहकांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिलेल्या निर्णयाविरुद्ध या खंडपीठात अपील दाखल करता येणार आहे़ २० लाखांपेक्षा अधिक रकमेचे मूळ अधिकार क्षेत्रातील दावे या ठिकाणी चालविले जाणार असून, या परिक्रमा खंडपीठाचे कामकाज महिन्यातून आठ दिवस नाशिकच्या खंडपीठात चालेल़ या खंडपीठापुढे नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ातील तक्रारींचे कामकाज या खंडपीठात चालणार असून, ग्राहक व वकील यांचा मुंबईला जावे लागणार नसल्याने वेळेची व पैशांचीही बचत होणार आहे़