शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडी बनवण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना सुरुंग? या राज्यात बसपा स्वबळावर लढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 10:58 IST

2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी महाआघाडी बनवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र काँग्रेसच्या या प्रयत्नांना सुरूंग लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नवी दिल्ली - 2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी महाआघाडी बनवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र काँग्रेसच्या या प्रयत्नांना सुरूंग लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार देत बहुजन समाज पक्षाने राज्यातील सर्व 230 जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मात्रा काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये बसपासोबत आघाडी होण्याची अद्यापही आशा असून, निवडणुकीस अद्याप उशीर आहे. तसेच आम्ही समान विचारसरणीच्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवू इच्छितो, असे काँग्रेस प्रवक्ते मानक अग्रवाल यांनी सांगितले.  बसपाचे मध्य प्रदेश अध्यक्ष नर्मदा प्रसाद अहिरवार यांनी सांगितले की, "पुढील निवडणुकीत बसपासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेसची चर्चा सुरू आहे, असे काँग्रेसचे नेते सांगत असल्याचे मला प्रसारमाध्यमांकडून समजले. मात्र अशा आघाडीसाठी राज्य स्तरावर आमची कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, तसेच माझ्या माहितीप्रमाणे केंद्रीय पातळीवरही अशी चर्चा झालेली नाही. काँग्रेससोबत आघाडीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडून मला कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत आम्ही राज्यातील सर्व 230 जागांवर निवडणूक लढवणारा आहोत."दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रसारमाध्यमप्रमुख माणक अग्रवाल यांनी राज्यात आघाडी करण्यासाठी बसपाचे नावच घेतले नसल्याचा दावा केला आहे."आघाडीसाठी आम्ही कुठल्याही पक्षाचे नाव घेतलेले नाही. काँग्रेस पक्ष मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न करेल, असे आमच्या पक्षाकडून सांगण्यात आले होते. आम्ही बसपाचे नाव कधीही घेतलेले नाही.  

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीMadhya Pradeshमध्य प्रदेश