शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खातेधारकांच्या 'या' क्षुल्लक चुकीमुळे स्टेट बँकेनं 40 महिन्यात कमावले 39 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 17:20 IST

ग्राहकांच्या छोट्याश्या चुकीमुळे बँकेच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांच्या एका क्षुल्लक चुकीतून तब्बल 39 कोटी रुपयांची कमाई केली आहे. स्टेट बँकेनं चेकवर योग्य स्वाक्षरी नसल्यानं ग्राहकांकडून गेल्या 40 महिन्यांमध्ये दंडाच्या माध्यमातून 39 कोटी रुपये कमावले आहेत. चेकवर योग्य स्वाक्षरी नसल्यानं स्टेट बँकेनं गेल्या 40 महिन्यांमध्ये 24 लाख 71 हजार 544 चेक परत पाठवले आहेत. एका आरटीआयमुळे ही आकडेवारी पुढे आली. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, एखादा चेक परत पाठवल्यावर बँक ग्राहकाकडून 150 रुपयांचा दंड आकारते. यावर जीएसटीदेखील लावला जातो. त्यामुळे ग्राहकाला 157 रुपये मोजावे लागतात. एकीकडे ग्राहकांना दंड भरावा लागत असताना, यामुळे बँकेच्या तिजोरीत मात्र कोट्यवधी रुपयांची भर पडली आहे. याशिवाय खात्यात किमान रक्कम न ठेवल्यानंही एसबीआयनं ग्राहकांकडून दंड आकारणी केली आहे. जानेवारीत अर्थ मंत्रालयानं या संदर्भातील माहिती दिली होती. गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात खात्यात किमान रक्कम न ठेवल्यानं एसबीआयनं ग्राहकांकडून 1771 कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता. 2015-16 या आर्थिक वर्षात एसबीआयनं 60 हजार 169 चेक परत पाठवले. 2016-17 या कालावधीत या संख्येत मोठी वाढ झाली. या काळात एसबीआयनं जवळपास 1 लाख चेक ग्राहकांना परत पाठवले. 2016-17 या आर्थिक वर्षात यामध्ये थोडी घट झाली. या वर्षात 80 हजार चेक बँकेनं ग्राहकांना परत केले. 2018-19 या आर्थिक वर्षात यामध्ये पुन्हा वाढ झाली. एप्रिलपर्यंत स्टेट बँकेनं 83 हजार 132 चेक ग्राहकांना परत पाठवले आहेत.  

टॅग्स :SBIएसबीआयGSTजीएसटीbankबँक