शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री येताच पाऊस सुरू झाला, गारा पडल्या; कार्यकर्त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन पळ काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 11:15 IST

काँग्रेस कार्यकर्ते ज्या खुर्च्यांवर बसले होते, त्या खुर्च्या डोक्यावर घेऊन निघून गेले. हा संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच झाला.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत विभागीय स्तरावरील कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी शुक्रवारी अजमेरला पोहोचले. मात्र मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी पोहोचताच जोरदार पाऊस सुरू झाला आणि गारा पडू लागल्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते ज्या खुर्च्यांवर बसले होते, त्या खुर्च्या डोक्यावर घेऊन निघून गेले. हा संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच झाला. कार्यकर्ते जात असल्याचं पाहून काही नेत्यांनी घाईघाईने सभास्थळाच्या गेटवर पोहोचून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते थांबले नाहीत. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील बॅनर, पोस्टरही फाडले. पण, मुसळधार पावसात अशोक गेहलोत यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनीही कौतुक केलं आहे. 

कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेसचे प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा पुढे म्हणाले, राजस्थान सरकारने ऐतिहासिक कामे केली आहेत. जनतेला पुन्हा एकदा राजस्थानची सत्ता काँग्रेसच्या हाती सोपवायची आहे. आता जनतेत जाऊन काँग्रेस सरकारचे यश सांगण्याची पाळी काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, आरटीडीसीचे अध्यक्ष धर्मेंद्र सिंह राठोड, काँग्रेसचे गुजरात प्रभारी रघु शर्मा आणि अन्य नेत्यांनीही संबोधित केले.

कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना गेहलोत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. भाजपाच्या राजवटीत घटनात्मक संस्थांचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे देशाची घटना आणि लोकशाही आता धोक्यात आली आहे. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने अदानींचा मुद्दा उपस्थित केला आहे, त्यावर सरकारने उत्तर द्यायला हवे होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थान