शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Omicron Corona patient: मुलांच्या लसीकरणाला आजपासून प्रारंभ;ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पोहोचली दीड हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 05:57 IST

कोरोनाचे २७ हजार नवे रुग्ण; मुलांच्या लसीकरणास आजपासून प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे २७,५५३ नवे रुग्ण सापडले व २८४ जणांचा मृत्यू झाला. तसेच सक्रिय रुग्णांचा आकडा १ लाख २२ हजारांहून अधिक झाला आहे. ओमायक्राॅनने बाधित रुग्णांची संख्या १५२५ वर पोहोचली आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आज, सोमवारपासून प्रारंभ होत आहे. त्यात त्यांना लसीचा पहिला डोस दिला जाईल.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, एकूण रुग्णांच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची आकडेवारी ०.३५ टक्के आहे. गेल्या चोवीस तासांत सक्रिय रुग्ण १८,०२० ने वाढले आहेत. ३ कोटी ४८ लाख ८९ हजार १३२ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ४२ लाख ८४ हजार ५६१ जण बरे झाले. देशात नागरिकांना कोरोना लसीचे आतापर्यंत १४५.४४ कोटी डोस देण्यात आले. 

१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आज, सोमवारपासून प्रारंभ होत असून, कोविन ॲपवर साडेतीन लाखांपेक्षा अधिक मुलांची नोंदणी झाली. देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील १० कोटी मुले असून, त्यांना देण्यात येणाऱ्या लसींमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा समावेश असेल. मुलांना लसीच्या पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल. मुलांना डोस देताना लसींची सरमिसळ होऊ नये म्हणून स्वतंत्र लसीकरण केंद्रे स्थापन करावीत, अशा सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यांना दिल्या आहेत. 

ओमायक्रॉनचे ५६० रुग्ण बरे झालेओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १५२५ झाली असून, त्यातील ५६० जण बरे झाले. या नव्या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून, त्यानंतर दिल्ली, गुजरात, तमिळनाडू, केरळ यांचा क्रमांक लागतो. नव्या विषाणूचा २३ राज्यांमध्ये प्रसार झाला. तिसऱ्या डोसमुळे वाढते प्रतिकारशक्तीकोरोना लसीचा तिसरा डोस हा बुस्टर डोस म्हणून दिला जातो. त्यामुळे ओमायक्रॉनच्या संसर्गाविरोधात लढण्याची माणसाची प्रतिकारशक्ती ८८ टक्क्यांनी वाढते, असे इंग्लंडमध्ये एका अभ्यासात आढळून आले आहे. लसीच्या दुसऱ्या डोसपेक्षा तिसऱ्या डोसने अधिक प्रमाणात संरक्षण मिळते, अशी माहिती संशोधक डॉ. एरिक टॉपोल यांनी दिली. 

दिल्लीत तीन दिवसांत तिप्पट काेराेना रुग्णकेवळ तीन दिवसांत दिल्लीत काेराेना रुग्णांची संख्या तिपटीने वाढली असून, आता दिल्लीत काेराेना रुग्णांची संख्या ६३०६  वर पाेहाेचली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मात्र स्थिती चिंताजनक नसल्याचा दावा केला आहे.अचानकपणे गेल्या तीन दिवसांत दिल्लीत काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. २९  डिसेंबरला दिल्लीत नवे १३१३ काेराेना रुग्ण मिळाले हाेते. २ जानेवारीला दिल्लीतील काेराेना रुग्णांच्या संख्येने ६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तरीही स्थिती चिंताजनक नसल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकारांशी बाेलताना केला. रुग्णालयात दाखल हाेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. आज दिल्लीत ३७ हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ ८२ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आहे. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस