त्रिदिनात्मक कार्यक्रमास उत्साहात प्रारंभ

By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:28+5:302015-03-06T23:07:28+5:30

नेवासा : श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा यांचे गुरू व साईबाबांचे गुरूबंधू विश्वेश्वर श्री नाथबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. ६ मार्च ते ८ मार्च या कालावधीत त्रिदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या त्रिदिनात्मक सोहळ्यास शुक्रवारी, दि. ६ मार्चपासून उत्साहात प्रारंभ झाला.

Start with the thrill of the three-dimensional program | त्रिदिनात्मक कार्यक्रमास उत्साहात प्रारंभ

त्रिदिनात्मक कार्यक्रमास उत्साहात प्रारंभ

वासा : श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा यांचे गुरू व साईबाबांचे गुरूबंधू विश्वेश्वर श्री नाथबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. ६ मार्च ते ८ मार्च या कालावधीत त्रिदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या त्रिदिनात्मक सोहळ्यास शुक्रवारी, दि. ६ मार्चपासून उत्साहात प्रारंभ झाला.
विश्वेश्वर श्री नाथबाबा व श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व गुरूवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री नाथबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे हे २४ वे वर्ष आहे.
त्रिदिनात्मक पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ह.भ.प. गंगाधर महाराज गाडेकर व ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पेचे यांचे प्रवचन तर ह.भ.प. नंदकिशोर महाराज खरात व संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख यांचे रात्री ८ ते १० या वेळेत दि. ६ मार्च ते ७ मार्च या कालावधीत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता नाथबाबांच्या पादुकांची मिरवणूक व ८ मार्च (रविवारी) विश्वेश्वर नाथबाबांना महाभिषेक घालण्यात येऊन श्रीक्षेत्र देवगडचे महंत गुरूवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या ९ ते ११ या वेळेत होणार्‍या काल्याच्या कीर्तनाने श्री नाथबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता होणार आहे. त्रिदिनात्मक सोहळ्यानिमित्त आयोजित प्रवचन व कीर्तनाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विश्वेश्वर नाथबाबा ट्रस्ट व नेवासा बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.

Web Title: Start with the thrill of the three-dimensional program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.