श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या हिमालयात असलेल्या पवित्र अमरनाथ यात्रेकरिता चोख बंदोबस्त करण्यात आला असून, ती शनिवारी गंडेरबाल जिल्ह्यातील बाल्टाल मार्गे रवाना झाली.
येथील शिबिरांमध्ये काल सुमारे आठ हजार भाविक एकत्र जमले असून, त्यांनी 16 कि.मी.चा हा प्रवास सुरू केला आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा जे अमरनाथ मंदिराच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी प्रथम पूजा करून या भाविकांना रवाना केले.
742 भाविकांचे दुसरे पथकही रवाना
जम्मू येथे जमलेल्या भाविकांपैकी 742 भाविकांचे दुसरे पथक अमरनाथकडे रवाना झाले. यात 626 पुरुष, 1क्2 स्त्रिया, 14 मुले आहेत. हे पथक 34 गाडय़ांसह आज सकाळी भगवतीनगर शिबिरातून रवाना झाले. आतार्पयत 19क्2 भाविक अमरनाथ मंदिराकडे रवाना झाले आहेत. (वृत्तसंस्था)