मेशी : येथील जगदंबा माता मंदिरात नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून यानिमित्त मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गावातल्या मध्यवर्ती भागात जगदंबा माता मंदिर आहे. यावेळी बहुसंख्य भाविक घटी बसले आहेत. नवरात्रोत्सवात दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरती होणार आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. मेशी परिसरातील जागृत दैवत म्हणून जगदंबा माता प्रसिद्ध आहे. या काळात घरोघरीदेखील घट बसविण्यात आले आहेत.
मेशीच्या जगदंबा माता मंदिरात नवरात्रोत्सवास प्रारंभ
By admin | Updated: October 2, 2016 23:27 IST