सभापती निवडीसाठी हालचाली सुरू
By admin | Updated: March 16, 2016 08:34 IST
जळगाव : मनपातर्फे प्रभाग समिती सभापतींचा एक वर्षाचा कालावधी संपत आल्याने निवडणुकीसाठी मनपाच्या चारही प्रभाग समित्यांची विशेष बैठक २१ रोजी होत आहे. यंदा खाविआ, मनसे, जनक्रांती, राष्ट्रवादी सोबत असल्याने भाजपाल निवडणूक सोपी झाली आहे. दरम्यान इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
सभापती निवडीसाठी हालचाली सुरू
जळगाव : मनपातर्फे प्रभाग समिती सभापतींचा एक वर्षाचा कालावधी संपत आल्याने निवडणुकीसाठी मनपाच्या चारही प्रभाग समित्यांची विशेष बैठक २१ रोजी होत आहे. यंदा खाविआ, मनसे, जनक्रांती, राष्ट्रवादी सोबत असल्याने भाजपाल निवडणूक सोपी झाली आहे. दरम्यान इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत.उमेदवार नििती झालेली नसली तरीही भाजपालाही एखाद्या समितीत संधी दिली जाते का? याबाबतही उत्सुकता आहे. गतवर्षी ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. ----- इन्फो---असा आहे कार्यक्रम१६ ते १८ मार्च या कालावधित दुपारी १वाजेपर्यंत नगरसचिव कार्यालयात कोरे नामनिर्देशनपत्र दिले जातील. तर १९ रोजी सकाळी ११ ते २ यावेळात नगरसचिव कार्यालयात भरलेले अर्ज स्वीकारले जातील. अर्जांची छाननी २१ रोजी सभा सुरू झाल्यावर होईल. तर माघारीसाठी छाननीनंतर १५ मिनिटांचा कालावधी दिला जाईल. आवश्यकता भासल्यास मतदान घेतले जाईल.