पाटण्यात चेंगराचेंगरी
By Admin | Updated: October 4, 2014 03:01 IST2014-10-04T03:01:47+5:302014-10-04T03:01:47+5:30
पाटणा येथील गांधी मैदानावर दसरा महोत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 32 जण ठार, तर अनेक जखमी झाले आहेत.

पाटण्यात चेंगराचेंगरी
>दस:याला गालबोट : गांधी मैदानावर रावण वधाच्या कार्यक्रमानंतर दुर्घटना
पाटणा : पाटणा येथील गांधी मैदानावर दसरा महोत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 32 जण ठार, तर अनेक जखमी झाले आहेत. मृतांत महिला व मुलांची संख्या अधिक आहे.
रावण वधाचा कार्यक्रम पाहून लोक परतत असताना ही दुर्घटना घडली. पाटणा येथील गांधी मैदानावर ‘रावण वध’ पाहण्यास मोठा जमाव जमला होता. लोक जास्त असल्याने चेंगराचेंगरी झाली, त्यात 32 लोक ठार झाल्याचे बिहारचे गृहसचिव अमीर सुभानी यांनी सांगितले. मृतांत 2क् महिला व 5-6 मुलांचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार चालू आहेत.
रावणाचा 6क् फूट उंच पुतळा उभारला होता. दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी दरवर्षी 5क् हजाराहून अधिक लोक जमतात. हा कार्यक्रम पाहण्यास बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी गांधी मैदानावर उपस्थित होते. राज्यातील संयुक्त जनता दलाचे प्रमुख शरद यादव यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
च्पाटना शहरातील गांधी मैदानावरील रस्त्यावरून पुढे जाण्यास रेटारेटी सुरु होती.
च्त्याचवेळी विद्यूत प्रवाह सुरु असलेली वीजेची तार जमिनीवर पडल्याची अफवा पसरली.
च्त्यामुळे घबराट पसरली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली.
2 लाखाची मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून यातील मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास 2 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून गंभीररित्या जखमी झालेल्यांसाठी 5क् हजार रुपयांची मदत दिली जाईल.
सोनिया गांधींकडून सांत्वन
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दुर्घटनेतील जिवितहानीमुळे धक्काच बसला असे म्हटले असून, दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पासवानांचे राजकारण
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत हा अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने ठोस उपाययोजना केल्या नसल्याचा अरोप केला. बिहारमध्ये छट पुजेच्यावेळी चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने यापासून योग्य तो धडा घेतला नसल्याचा दावा पासवान यांनी केला.