पश्चिम बंगालच्या गंगासागर यात्रेत चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू

By Admin | Updated: January 16, 2017 07:22 IST2017-01-15T20:09:53+5:302017-01-16T07:22:57+5:30

पश्चिम बंगालच्या गंगासागर येथील यात्रेत चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 6 श्रद्धाळूंचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.

Stampede in Gangasagar, West Bengal, 6 people die | पश्चिम बंगालच्या गंगासागर यात्रेत चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालच्या गंगासागर यात्रेत चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि.15 - पश्चिम बंगालच्या गंगासागर येथील यात्रेत चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 6 श्रद्धाळूंचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींचा नेमका आकडा अजून समजू शकलेला नाही.  जखमींमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार बंकिम हाजरा यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर बचावाकार्यासाठी पथकं तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

चेंगराचेंगरीची माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफ आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

मकर संक्रांतीच्या निमित्ताने गंगासागर यात्रेत श्रद्धाळू गंगास्नानसाठी पोहोचतात.  गंगासागरला कुंभ मेळ्यानंतर देशातील सर्वात मोठा मेळा मानला जातो.  श्रद्धाळू कोचुबेरिया घाट येथून एका बोटीत जाण्याचा प्रयत्न करत असताना चेंगराचेंगरीची घटना घडल्याचं प्राथमिक वृत्त आहे. 

 पश्चिम बंगालचे ग्रामविकास मंत्री सुब्रता मुखर्जी यांच्या माहितीनुसार, मकर सक्रांतीनिमित्त डुबकी मारण्यासाठी आणि कपिल मुनी मंदिरात पूजा करण्यासाठी जवळपास 16 लाख भाविक आले होते.
 

Web Title: Stampede in Gangasagar, West Bengal, 6 people die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.