शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 08:26 IST

उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये श्रावणी सोमवारी जिल्ह्यातील हैदरगड भागात असलेल्या प्रसिद्ध अवसानेश्वर महादेव मंदिरात मोठी दुर्घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये श्रावणी सोमवारी जिल्ह्यातील हैदरगड भागात असलेल्या प्रसिद्ध अवसानेश्वर महादेव मंदिरात मोठी दुर्घटना घडली आहे. जलाभिषेकादरम्यान अचानक विद्युत प्रवाहामुळे चेंगराचेंगरी झाल्याने गोंधळ उडाला. या दुर्घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला, तर ४० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३ वाजताच्या सुमारास मंदिर परिसरात जलाभिषेकासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते तेव्हा ही घटना घडली. मृतांमध्ये लोणीकात्रा पोलीस स्टेशन परिसरातील मुबारकपुरा गावातील २२ वर्षीय रहिवासी प्रशांत आणि आणखी एका भाविकाचा समावेश आहे. दोघांनाही उपचारासाठी त्रिवेदीगंज सीएचसी येथे आणण्यात आलं होतं मात्र त्यांचा मृत्यू झाला.

एका माकडाने विद्युत तारेवर उडी मारली, ज्यामुळे तार तुटली आणि मंदिर परिसरातील टिन शेडवर पडली. वायर पडताच शेडमध्ये करंट पसरला, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेले लोक घाबरले आणि चेंगराचेंगरी झाली. डीएमसह सर्व अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

उत्तराखंडमधील हरिद्वार येथील प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात रविवारी सकाळी गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि मदतकार्य सुरू करण्यात आलं होतं.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशTempleमंदिरStampedeचेंगराचेंगरी