शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

"ही तर घातक मानसिकता...!" स्टॅलिन सरकारनं '₹' चं चिन्ह बदललं, निर्मला सीतारमण भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 10:24 IST

यासंदर्भात बोलताना, हा राष्ट्रीय चिन्हाचा अनादर असल्याचे भाजपने म्हटले आहे. तर हा तमिळ भाषेचा सन्मान असल्याचे डीएमकेने म्हटले आहे.   

तामिळनाडू सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पासाठी काही प्रचार साहित्य तयार केले आहे. यात त्यांनी भारतीय रुपयाच्या चिन्हाशी छेडछाड करत, ते तमिळ भाषेत केले आहे. स्टॅलिन सरकारच्या या कृत्यामुळे आता राजकारण तापले आहे. यासंदर्भात बोलताना, हा राष्ट्रीय चिन्हाचा अनादर असल्याचे भाजपने म्हटले आहे. तर हा तमिळ भाषेचा सन्मान असल्याचे डीएमकेने म्हटले आहे.  "ही तर घातक मानसिकता..." -स्टॅलिन सरकारच्या या कृत्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण भडकल्या आहेत. त्या गुरुवारी म्हणाल्या, तामिळनाडू सरकारने रुपयाचे चिन्ह हटवले, त्यांचे हे पाऊल  म्हणजे, घातक  मानसिकतेचा संकेत आहे. यामुळे देशाची एकात्मता कमकुवत होते. एवढेच नाही, तर डिएमके केवळ एक राष्ट्रीय प्रतीकच नाकारत नाही, तर एका तमिळ तरुणाच्या सर्जनशील योगदानाकडेही दुर्लक्ष करत आहे. 

फुटिरतानाद्यांना प्रोत्साहन मिळेल -यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यात, "ही एक घातक मानसिकता आहे. जी देशाच्या एकतेला कमकुवत करते आणि प्रादेशिक अभिमानाच्या नावाखाली फुटीरतावादी विचारांना प्रोत्साहन देते. भारतीय रुपयाचे चिन्ह आंतरराष्ट्रीय पातळीवरही चांगल्या प्रकारे ओळखले जाते. तसेच, जागतिक आर्थिक व्यवहारांमध्ये भारताची ओळख म्हणून काम करते. भारत यूपीआय वापरून सीमापार पेमेंटला प्रोत्साहन देत असतानाच, आपण खरोखरच आपल्या स्वतःच्या राष्ट्रीय चलन चिन्हाला कमी लेखले योग्य आहे?”

राष्ट्रीय एक्याला धोका -केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या, ‘‘खरे तर, इंडोनेशिया, मालदीव, मॉरीशस, नेपाळ, सेशेल्स आणि श्रीलंकेसह अनेक देश आपले चलन अधिकृतपणे, 'रुपया' अथवा या नावाशी मिळत्या जुळत्या नावाने वापरतात.’’ त्या पुढे म्हणाल्या, “सर्व निवडून आलेले प्रतिनिधी आणि अधिकारी आपल्या राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्यासाठी संविधानांतर्गत शपथ घेतात. राज्याच्या अर्थसंकल्पीय कागदपत्रांमधून रुपयासारखे राष्ट्रीय चिन्ह काढून टाकणे हे त्या शपथेविरुद्ध आहे. यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची वचनबद्धता कमकुवत होते."

यावेळी, ‘‘विडंबन म्हणजे, रुपयाचे चिन्ह डीएमकेचे माजी आमदार एन. धर्मलिंगम यांचे पुत्र डी उदय कुमार यांनी डिझाइन केले होते. आता हे नाकारत,  डिएमके केवळ एका राष्ट्रीय प्रतिकच नाकारत नाही, तर एका तमिळ तरुणाच्या सर्जनशील योगदानाकडेही पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे," असेही सीतारामण म्हणाल्या. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनTamilnaduतामिळनाडूBJPभाजपा