पावसामुळे ठिकठिकाणी साचले पाणी

By Admin | Updated: May 8, 2014 18:22 IST2014-05-08T18:22:32+5:302014-05-08T18:22:32+5:30

विजेचा लपंडाव : दोन वृक्ष कोसळले

Stains due to rain due to water | पावसामुळे ठिकठिकाणी साचले पाणी

पावसामुळे ठिकठिकाणी साचले पाणी

िवारी मुंबईत बैठक, लोकसभेचा घेणार आढावा, नाशिकसाठी दोन जादा जागांची करणार मागणी
नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच मुंबईला बैठक घेऊन पक्षनेत्यांना व पदाधिकार्‍यांना विधानसभेच्या तयारीला लागा,असे आदेश दिल्यानंतर आता कॉँग्रेसनेही विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उद्या शनिवारी (दि.३) राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांची तातडीची बैठक टिळक भवनात बोलविण्यात आली आहे.
मुंबईच्या टिळक भवनात सकाळी ११ वाजता प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीतच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाचा व लढविलेल्या जागांपैकी किती जागांवर नेमका विजय मिळेल, याबाबतही संबंधित पदाधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात येणार असल्याचे कळते. तसेच भविष्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये नेमक्या किती जागा लढवायच्या आणि किती जागा वाढवून घ्यायच्या यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते. नाशिक जिल्‘ातून विधानसभेसाठी यापूर्वी बागलाण, सिन्नर, इगतपुरीबरोबरच शहरातील पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघ कॉँग्रेसने लढविले आहेत. त्यातही कॉँग्रेसच्या ताब्यातील येवला व नांदगाव मतदारसंघ राष्ट्रवादीने घेतल्याने स्थानिक पदाधिकार्‍यांमध्ये त्यावेळी रोष होता. त्यामुळे विधानसभेच्या तयारीसाठी बोलविण्यात आलेल्या या बैठकीत जागांच्या अदलाबदलासह वाढीव जागांच्या मागणीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)
इन्फो..
निफाड व नांदगावची मागणी करणार
शनिवारी होणार्‍या बैठकीत जिल्हा कॉँग्रेसतर्फे ताब्यात असलेल्या शहरातील पूर्व व मध्य विधानसभा मतदारसंघाबरोबरच इगतपुरी, सिन्नर, बागलाण विधानसभा मतदारसंघांवर दावा कायम ठेवण्याबरोबरच निफाड व नांदगाव विधानसभा मतदारसंघांवरही दावा सांगण्यात येणार आहे. हे मतदारसंघ जरी आज राष्ट्रवादीच्या ताब्यात असले तरी पूर्वीपासूनचे ते कॉँग्रेसचे मतदारसंघ असल्याने या दोन जागा वाढवून मिळाव्यात असा आग्रह स्थानिक पदाधिकार्‍यांनी आपल्याकडे केला आहे. त्यामुळे या दोेन जागा वाढवून मिळण्यासंदर्भात आपण पक्षनेतृत्वाकडे मागणी करणार आहे.
राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय कॉँग्रेस पक्ष,नाशिक

Web Title: Stains due to rain due to water