स्टाफ सिलेक्शन कमीशनचा पेपर फुटला, १८ कॉपी बहाद्दरांना अटक
By Admin | Updated: November 10, 2014 18:34 IST2014-11-10T18:33:02+5:302014-11-10T18:34:13+5:30
या परीक्षेत १८ जणांना कॉपी करताना पकडण्यात आले. या पूर्वीही दोन नोव्हेंबर रोजी याच पदाकरता झालेल्या परीक्षेत तीन जणांना कॉपी करताना अटक केली होती

स्टाफ सिलेक्शन कमीशनचा पेपर फुटला, १८ कॉपी बहाद्दरांना अटक
>ऑनलाइन लोकमत
अल्मोडा(उत्तराखंड), दि. १० - ९ नोव्हेंबर (रविवार) रोजी कर्मचारी चयन आयोगाने (स्टाफ सिलेक्शन कमीशन) इयत्ता बारावी पास शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांची परीक्षा घेतली होती. या परीक्षेत १८ जणांना कॉपी करताना पकडण्यात आले. यापैकी एका विद्यायार्थ्याने कॉपी गिळत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या पूर्वीही दोन नोव्हेंबर रोजी याच पदाकरता झालेल्या परीक्षेत तीन जणांना कॉपी करताना अटक केली होती. पकडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना याबाबत अधिक विचारले असता या मागे स्पर्धा परीक्षेचे क्लास चालवणारा एक शिक्षक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हलद्वानी येथील कर्मचारी चयन आयोगाचे अधिकारी हरबीर सिंह आणि जीसी टम्टा यांनी रविवारी सकाळी डिएवी सीनीयर सेकंडरी शाळेत छापा मारत सौरभ धामा या विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान मोबाईल घेउन बसला असताना पकडले. त्याची अधिक चौकशी केली असता मेरठ येथे स्पर्धा परीक्षांची शिकवणी घेणा-या पंकज धामाने त्याला प्रश्नपत्रिकेची उत्तरं आगोदर पुरवली असल्याचे त्याने सांगितले. शनिवारी(दि.८ नोव्हेंबर) संध्याकाळी एका अज्ञात व्यक्तीने या प्रकरणाबाबत डिएवी शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून कळवले होते.
त्यानंतर या अधिका-यांनी क्वीन्स हायर सेकंडरी शाळेत छापा घालत निर्दोष कुमार, सन्नी पवार, बृजमोहन, पट्टी रामपूर या चौघांना कॉपी करताना पकडले. तसेच क्वीन्स शाळेतीलच दुपारच्या सत्रात परीक्षा द्यायला आलेल्या अंकुर, अविनाश, विनित आणि सोनू या चौघांना कॉपी करताना पकडले. केंद्र निरीक्षक रनवीर ठाकूर यांच्या देखरेखी अंतर्गत या विद्यार्थ्यांची कॉपी मोहरबंद करण्यात आली, व या घटनेची माहिती कर्मचारी चयन आयोगाच्या दिल्ली येथील मुख्यालयाला देण्यात आली.