विमानांवर दगडफेक

By Admin | Updated: September 14, 2014 03:07 IST2014-09-14T03:07:19+5:302014-09-14T03:07:19+5:30

सशस्त्र दलाच्या विमानांना, बोटी व हेलिकॉप्टर्सना दगडफेकीचे लक्ष्य केले जात असले तरी या संकटाला सामोरे जात मदतकार्य सुरू ठेवण्याचा जवानांचा निर्धार अढळ आहे.

Stacked aircraft | विमानांवर दगडफेक

विमानांवर दगडफेक

हेलिकॉप्टर्सही लक्ष्य : काश्मीरमध्ये मदतीवर संकट 
श्रीनगर : काश्मीर खो:यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आलेल्या सशस्त्र दलाच्या विमानांना, बोटी व हेलिकॉप्टर्सना दगडफेकीचे लक्ष्य केले जात असले तरी या संकटाला सामोरे जात मदतकार्य सुरू ठेवण्याचा जवानांचा निर्धार अढळ आहे.  दगडफेकीत भारतीय हवाईदलाच्या 8क् विमानांचे या दगडफेकीने नुकसान झाले आहे.  गेल्या 12 दिवसांत सश दले, एनडीआरएफ व अन्य मदत पथकांनी जिवाची बाजी लावीत आतार्पयत 1 लाख 42 हजार नागरिकांना वाचविले आहे.
  हवाईदल व लष्कराची 86 मालवाहू विमाने, हेलिकॉप्टर्स व 3क् हजार जवान अहोरात्र मदत करीत आहेत. हवाईदलाच्या रोटरी विंग विमानाला उड्डाणासमयी या दगडफेकीचा सामना करावा लागला. कमी उंचीवरून उडणा:या विमानांवर ही दगडफेक केली जात असल्याचे एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले. एका विमानाच्या पंखाला व बाहेरील भागावर हे दगड आदळून त्या विमानाचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. याच प्रकारे नावा व हेलिकॉप्टर्सवरही दगडफेक करून  नुकसान केले जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
शस्त्रस्त्रे निकामी
काश्मीर खो:यात तैनात असलेल्या लष्कर, निमलष्करी दले व अन्य सुरक्षा यंत्रणोचे पुराच्या तडाख्याने प्रचंड नुकसान झाले. यात जवानांच्या चीजवस्तू पाण्यात नष्ट झाल्या असून त्यांची शेही निकामी झाली. 

 

Web Title: Stacked aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.