ठगबाज विजेश गुप्ता अहमदाबादला सापडला

By Admin | Updated: July 3, 2015 23:15 IST2015-07-03T23:15:54+5:302015-07-03T23:15:54+5:30

ठगबाज विजेश गुप्ता अहमदाबादला सापडला

The stabbed Vijesh Gupta was found in Ahmedabad | ठगबाज विजेश गुप्ता अहमदाबादला सापडला

ठगबाज विजेश गुप्ता अहमदाबादला सापडला

बाज विजेश गुप्ता अहमदाबादला सापडला

नागपूर :
भरमसाट व्याजाचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधीचा चुना लावून फरार झालेला ठगबाज विजेश गुप्ता तब्बल वर्षभरानंतर अहमदाबाद पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याला आणण्यासाठी लकडगंज पोलिसाची एक चमू अहमदाबादला रवाना झाली आहे.
गुप्ताची वर्धमाननगर येथे मंगलम कोल नावाची कंपनी होती. तो नंदनवन येथील इंदिरा देवी टाऊनमध्ये राहत होता. भरमसाट व्याज आणि कोळशाच्या व्यापारात गुंतवणूक करण्याचे तो आमिष दाखवायचा. समाजसेवेने लोकांना प्रभावित करायचा. त्यामुळे अनेकांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली होती. जून २०१४ मध्ये तो कुटुंबासह फरार झाला होता. त्यानंतर त्याचे प्रताप उघडकीस आले. गुप्ताच्या विरुद्ध चंद्रकांत तेलमासरे, हर्षद घोटोले, यादवराज जळगावकर यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर लकडगंज पोलिसांनी त्याच्याविरद्ध ५२ लाख रुपयाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून पोलीस गुप्ताच्या शोधात होते. गुप्ता आपल्या जावयाच्या मदतीने अहमदाबादला लपून होता. त्याने तिथेही लोकांना फसविले. अहमदाबाद पोलिसांनी त्याला अटक केली असून स्थानिक पोलिसांना सूचित केले. गुप्ताचा फ्लॅट बँकेने सील केला आहे.

Web Title: The stabbed Vijesh Gupta was found in Ahmedabad