एस.टी.बसच्या धडकेत रिक्षातील तरुण ठार
By Admin | Updated: October 16, 2016 21:27 IST2016-10-16T21:27:02+5:302016-10-16T21:27:02+5:30
जळगाव: भरधाव वेगाने जाणार्या एस.टी.बसने समोरुन येणार्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने त्यातील सागर भालचंद्र सूर्यवंशी (वय १९ रा.समता नगर, जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला तर चालक समाधान एकनाथ सपकाळे (वय २६ रा.जामठी, ता.धरणगाव ह.मु.समता नगर, जळगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी दुपारी तीन वाजता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर झाला.
