शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

SSC CGL Notification 2020: केंद्र सरकारच्या या विभागात नोकरीची संधी, ६ हजार ५०६ पदांसाठी निघालीय भरती

By बाळकृष्ण परब | Published: December 29, 2020 3:55 PM

SSC CGL Notification 2020: स्टाफ सिलेक्शन कमिटी (एसएससी) ने एसएससी सीजीएल २०२० साठी नोटिफिकेशन जारी केले आहे.

ठळक मुद्दे एसएससी सीजीएल २०२० च्या टीयर १ ची परीक्षा २९ मे पासून ७ जून २०२१ दरम्यान आयोजित होणार आहेपात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळ असलेल्या ssc.nic.in  वर देण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशनच्या आधारावर अर्ज करू शकतात या भरती प्रक्रियेत ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील एकूण सहा हजार ५०६ पदांची भरती करण्यात येणार

नवी दिल्ली - स्टाफ सिलेक्शन कमिटी (एसएससी) ने एसएससी सीजीएल २०२० साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. त्याबरोबरच एसएससी-सीजीएल परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी परीक्षेची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार एसएससी सीजीएल २०२० च्या टीयर १ ची परीक्षा २९ मे पासून ७ जून २०२१ दरम्यान आयोजित होणार आहे.ही परीक्षा संगणकावर आधारित असेल. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळ असलेल्या ssc.nic.in  वर देण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशनच्या आधारावर अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख ३१ जानेवारी २०२१ निर्धारित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील एकूण सहा हजार ५०६ पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रुप बीमधील गॅझेटेड श्रेणीतील २५० पदे, ग्रुप बीमध्ये नॉन गॅझेटेड श्रेणीची ३ हजार ५१३ पदे आणि ग्रुप सी मधील २ हजार ७४३ पदांची भरती होणार आहे.स्टाफ सिलेक्शन कमिटीकडून आयोजित होणाऱ्या या परीक्षेसाठी कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थेकडून कुठल्याही विषयावर पदवी किंवा त्याच्या समकक्ष पदवी मिळवलेले उमेदवार अर्ज करू शकतील.या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांसाठीची वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार काही पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निर्धारित करण्यात आली आहे. सोबतच आरक्षित वर्गांसाठी वयोमर्यादित सूट देण्यात आली आहे.या भरती प्रक्रियेमध्ये केंद्र सरकारच्या विविध विभागातील इन्स्पेक्टर सेंट्र्ल एक्साइज, असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाऊंट ऑफिसर, इन्स्पेक्टर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर असिस्टंट, इन्स्पेक्टर एक्झामिनर, इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर (सीबीआय), असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर, ज्युनियर स्टेटिस्टिकल ऑफिसर, इन्स्पेक्टर (डाक विभाग आणि सेंट्रल ब्युरो ऑफिस ऑफ नार्कोटिक्स), ऑडिटर, सिनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट, असिस्टंट सुपरिटेंडेंट, डिव्हिजनल अकाऊंटंट, अप्पर डिव्हिजनल क्लार्क (यूडीसी), टॅक्स असिस्टंट पदांवर भरती निघाली आहे.

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीjobनोकरी