श्रीरामपूर सिंगल

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:22+5:302015-09-01T21:38:22+5:30

सरपंचपदी खंडागळे

Srirampur Single | श्रीरामपूर सिंगल

श्रीरामपूर सिंगल

पंचपदी खंडागळे
श्रीरामपूर : वळदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसच्या मंगल खंडागळे, तर उपसरपंचपदी काँग्रेसचेच रामराव शेटे यांची बिनविरोध निवड झाली.
जनसेवा मंडळाने ९ पैकी ८ जागा जिंकून तिसर्‍यांदा काँग्रेसच्या ताब्यात ही ग्रामपंचायत ठेवली. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस पाटील शिवाजीराव भोसले, निवडणूक अधिकारी माने, ग्रामसेवक सुप्रिया शेटे यांनी सहकार्य केले.
बडाख सरपंच
श्रीरामपूर : राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या ताब्यात आलेल्या मालुंजा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसच्या संगीता निवृत्ती बडाख व उपसरपंचपदी याच पक्षाचे विलासराव नामदेवराव बडाख यांची निवड झाली. नागरिकांच्या मागास प्रवर्गातील स्त्रीसाठी सरपंचपद राखीव आहे. यासाठी संगीता बडाख, सुरेखा अच्युत बडाख व आशाबाई भाऊसाहेब बडाख यांनी अर्ज दाखल केले होते. आशाबाई यांनी माघार घेतल्याने संगीता व सुरेखा बडाख यांच्यात निवडणूक होऊन संगीता यांना ७ व सुरेखा बडाख यांना ४ मते मिळाली.
ताई पवार सरपंच
श्रीरामपूर : महांकाळ वाडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ताई दत्तात्रय पवार, तर उपसरपंचपदी अर्जुन दातीर यांची निवड झाली. ९ सदस्यांच्या या ग्रामपंचायतीत आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या गटाने ५ जागा मिळवून बहुमत मिळविले.

Web Title: Srirampur Single

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.