Jammu And Kashmir : किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार; एकाचा मृत्यू, एक जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 01:43 PM2019-04-09T13:43:24+5:302019-04-09T14:11:49+5:30

जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये मंगळवारी (9 एप्रिल) दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

srinagar firing in kishtwar hospital at jammu and kashmir | Jammu And Kashmir : किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार; एकाचा मृत्यू, एक जण जखमी 

Jammu And Kashmir : किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार; एकाचा मृत्यू, एक जण जखमी 

Next
ठळक मुद्दे जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये मंगळवारी (9 एप्रिल) दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. गोळीबारात वैद्यकीय सहाय्यक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य चंद्रकांत शर्मा हे जखमी झाले आहेत.शर्मा यांच्या सुरक्षा रक्षकाचा (पीएसओ) यामध्ये मृत्यू झाला आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये मंगळवारी (9 एप्रिल) दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. वैद्यकीय सहाय्यक चंद्रकांत शर्मा या गोळीबारात जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथील एका जिल्हा रुग्णालयात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात वैद्यकीय सहाय्यक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य चंद्रकांत शर्मा हे जखमी झाले आहेत. शर्मा यांच्या सुरक्षा रक्षकाचा (पीएसओ) यामध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या परिसराला घेराव घातला आहे. 


जम्मू-काश्मीरमध्ये 400हून अधिक नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय

जम्मू-काश्मीरमधील 400 हून अधिक नेत्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी राज्यातील 900 हून अधिक नेत्यांची सुरक्षा हटविली होती. तसेच, याप्रकरणी राज्यातील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सुरक्षा हटवण्यात आल्यामुळे प्रमुख नेत्यांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असे तक्रारीत म्हटले होते. 

Jammu And Kashmir : त्रालमध्ये जवानांनी 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरले

जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये रविवारी (7 एप्रिल) पहाटेपासून दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू होती. या परिसरात जैश ए मोहम्मदचे 3 दहशतवादी लपले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सुरक्षा दलांच्या जवानांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती मिळली होती. त्राल भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना मिळाली. त्यानूसार 42 राष्ट्रीय रायफलचे जवान, सीआरपीएफच्या 180 बटालीयनचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने या परिसराला घेराव घातला आहे. जवानांकडून शोध मोहीम राबविण्यात आली असता दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यावेळी जवानांनी देखील त्यांना उत्तर देत गोळीबार सुरू केला होता.  

शनिवारी (6 एप्रिल) शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात झालेल्या चकमकीत लष्कराला दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या परिसराला घेराव घातला. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबारास सुरुवात झाली. अखेरीस लष्कराने लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. याआधी पुलवामा जिल्ह्यात याच आठवड्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले होते. त्या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्याआधी गेल्या आठवड्याच शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले होते.  

दहशतवाद्यांनी केली सुट्टीवर आलेल्या जवानाची हत्या, कुटुंबीयांसमोरच झाडल्या गोळ्या

काश्मीरमधील सोपोर भागात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराच्या जवानाचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद रफी यातू असं या जवानाचे नाव असून त्याच्या कुटुंबीयांसमोर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. रफी हा सुट्टीसाठी त्याच्या सोपोरमधील वारपोरा गावी आला होता.

भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोएबाच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामा येथील लस्सीपुरा भागात काही दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं असून दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारे जप्त करण्यात आली होती. लष्कर ए तोएबाच्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. मृत दहशतवाद्यांकडून 2 एके रायफल्स, 1 एसएलआर आणि 1 पिस्तुल जप्त करण्यात आली होती. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 3 जखमी झाले होते तसेच त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू होते.

Web Title: srinagar firing in kishtwar hospital at jammu and kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.