शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

श्रीदेवींचा मृत्यू संशयास्पद नाही, फॉरेन्सिक अहवालातून कारण झाले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 14:34 IST

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवींचा मृत्यू हा हृदयविकाराच्या धक्क्यानंच झाला आहे, असं डॉक्टरांनी दिलेल्या फॉरेन्सिक रिपोर्टमधून उघड झालंय.

नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवींचा मृत्यू हा हृदयविकाराच्या धक्क्यानंच झाला आहे, असं डॉक्टरांनी दिलेल्या फॉरेन्सिक रिपोर्टमधून उघड झालंय. श्रीदेवींच्या शरीरात विषाचा कोणताही अंश नाही, असंही या रिपोर्टमधून स्पष्ट करण्यात आलं आहे. श्रीदेवींच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. दुबईमधल्या एका पत्रकाराच्या मते, जर रुग्णालयात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात येतो. परंतु जर मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाल्यास पोलीस या प्रकरणाचा तपास करून गुन्हा दाखल करतात, असे दुबईमध्ये कायदे आहेत. आणि जर एखाद्याचा मृतदेह दुबईतून दुस-या देशात पाठवायचा असल्यास प्रक्रिया खूपच किचकट असते. दुबईमधल्या अशा कायद्यामुळेच श्रीदेवींचा मृतदेह भारतात आणण्यात विलंब होतोय.  

आता फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर त्यांचे मृत्युपत्र बनवण्यात येणार आहे. त्यानंतर श्रीदेवी यांचे पासपोर्ट तपासले जातील. मग दुबईतलं भारतीय दूतावास त्यांचा पासपोर्ट रद्द करेल. त्यानंतर नो ऑब्सेक्शन सर्टिफिकेट आणि मृत्युपत्र दिले जाईल. ही सर्टिफिकेट्स अरबी भाषेमध्ये असात. त्याचे इंग्रजी भाषांतर करण्यात येईल आणि ते सर्टिफिकेट श्रीदेवीच्या कुटुंबीयांना देण्यात येईल आणि त्यानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात येईल.अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव संध्याकाळपर्यंत मुंबईत आणण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. श्रीदेवींची 'ती' शेवटची 30 मिनिटंदुबईमध्ये कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवीचा मृत्यू झाला. पण मृत्यूच्या आधी अर्धा तासाचा वेळ श्रीदेवीने पती बोनी कपूर यांच्याबरोबर घालवला होता. दुबईतील लग्नसोहळा आवरून बोनी कपूर मुंबईत परतले होते. पण श्रीदेवी यांना सरप्राइज डिनर देण्यासाठी ते पुन्हा दुबईला गेले. म्हणूनच अभिनेत्रीच्या शेवटच्या वेळी त्यांना तिच्याबरोबर राहता आलं. पती बोनी कपूर यांच्याबरोबर डिनर डेटवर जाण्यासाठी श्रीदेवी तयार व्हायला बाथरूममध्ये गेल्यावर त्याना कार्डिअॅक अरेस्टचा झटका आल्याचं वृत्त खलिज टाइम्सने दिलं आहे.कुटुंबीयाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न सोहळ्यानंतर मुंबईला परतलेले बोनी कपूर 24 फेब्रुवारी रोजी सध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पुन्हा दुबईत पोहचले. श्रीदेवी यांना त्यांच्या स्वप्नातील सरप्राईज डिनर डेटवर घेऊन जाण्यासाठी बोनी कपूर पुन्हा दुबईला गेले. बोनी कपूर दुबईतील जुमैरा एमिरेट्स टॉवरमधील श्रीदेवी यांच्या रूममध्ये पोहचल्यावर त्यांनी श्रीदेवी यांना उटवलं. त्यानंतर दोघांनी 15 मिनिटं गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना डिनर डेटसाठी विचारलं.डिनरला जायला तयार होण्यासाठी श्रीदेवी वॉशरूममध्ये गेल्या. जवळपास 15 मिनिटं त्या आतच होत्या. बराच वेळ होऊनही श्रीदेवी बाहेर न आल्याने बोनी कपूर यांनी दरवाजा वाजवला. पण आतून काहीही प्रतिसाद न आल्याने त्याने वॉशरूमचा दरवाजा तोडला. तेव्हा पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये श्रीदेवी बेशुद्धावस्थेत होत्या. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला व तरीही त्या शुद्धीवर न आल्याने बोनी कपूर यांनी मित्रांला फोन केला. रात्री नऊ वाजता यासंदर्भातील माहिती पोलिसांना समजली. 

टॅग्स :Srideviश्रीदेवी