श्रीलंका ८६ भारतीय मच्छीमारांना सोडणार
By Admin | Updated: October 25, 2015 23:16 IST2015-10-25T23:16:05+5:302015-10-25T23:16:05+5:30
गत दोन महिन्यांच्या काळात श्रीलंकन नौदलाने अटक केलेल्या तामिळनाडूच्या ८६ मच्छीमारांची सुटका होणार आहे. येत्या बुधवारी श्रीलंका या ८६ मच्छीमारांची सुटका करील

श्रीलंका ८६ भारतीय मच्छीमारांना सोडणार
चेन्नई : गत दोन महिन्यांच्या काळात श्रीलंकन नौदलाने अटक केलेल्या तामिळनाडूच्या ८६ मच्छीमारांची सुटका होणार आहे. येत्या बुधवारी श्रीलंका या ८६ मच्छीमारांची सुटका करील. याच दिवशी तामिळनाडू सरकारही दोन श्रीलंकन मच्छीमारांना मुक्त करणार आहे.
गत २२ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या काळात श्रीलंकन नौदलाने या सर्व तामिळनाडूच्या नागपट्टिणम, पुडुकोट्टई, तुतिकोरन व रामनाथपुरम येथील मच्छिमारांना अटक केली होती.