शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंका, नेपाळ यांनी अंतराळात सोडले उपग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 04:07 IST

भारताचे शेजारी श्रीलंका आणि नेपाळ यांनी गुरुवारी आपल्या पहिल्या उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे.

कोलंबो/काठमांडू : भारताचे शेजारी श्रीलंका आणि नेपाळ यांनी गुरुवारी आपल्या पहिल्या उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. श्रीलंकेच्या उपग्रहाचे नाव ‘रावण-१’ असे असून, नेपाळच्या उपग्रहाचे नाव ‘नेपालीसॅट-१’ असे आहे. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने या उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे.श्रीलंका आणि नेपाळ यांच्याबरोबरच जपानचाही एक उपग्रह यावेळी नासाने अवकाशात सोडला. बर्डस-३ नावाचे हे प्रक्षेपण यशस्वी झाल्याचे नासाच्या वतीने सांगण्यात आले. अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रक्षेपण तळावरून तिन्ही उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहांमुळे श्रीलंका आणि नेपाळ या दोन्ही देशांनी जागतिक अंतराळ युगात प्रवेश केला आहे.नेपाळची अंतराळ संशोधन संस्था ‘नेपाळ अकॅडमी आॅफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ने (एनएएसटी) आपल्या देशाच्या प्रक्षेपणाची अधिकृत माहिती जारी केली. नेपाळचे दोन शास्त्रज्ञ आभास मस्की आणि हरिराम श्रेष्ठ यांनी हा उपग्रह विकसित केला आहे. हे दोघेही सध्या जपानच्या क्युशू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेत शिकत आहेत. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी उपग्रहाचा विकास व प्रक्षेपणात सहभागी असलेल्या सर्व शास्त्रज्ञ आणि संस्थांचे अभिनंदन केले आहे. आपला स्वत:चा उपग्रह असणे ही देशासाठी अभिमानाची बाब आहे, असे ते म्हणाले.>श्रीलंकेचा ‘रावण-१’श्रीलंकेचा रावण-१ हा उपग्रह १.०५ किलो वजनाचा असून, त्याचे आयुष्य सुमारे दीड वर्षाचे आहे. हा उपग्रह जपानच्या क्युशू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेने डिझाईन केला असून, याच संस्थेत श्रीलंकेच्या दोन अभियंत्यांनी हा उपग्रह निर्माण केला आहे.

टॅग्स :NASAनासा