शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
4
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
5
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
6
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
7
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
8
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
9
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
10
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
11
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
12
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
13
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
14
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
16
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
17
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
18
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
19
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
20
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!

स्पुतनिक-व्ही लस भारतात, ‘सिंगल डोस’ही लवकरच येणार; पुढील आठवड्यात बाजारात होणार उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 06:32 IST

भारतात देशांतर्गत उत्पादन सुरू होईपर्यंत "स्पुतनिक व्ही" लस सुरूवातीच्या काळात आयात करण्यात येणार आहे. सर्वप्रथम दीड लाख डोसची पहिली खेप १ मे रोजी दाखल झाली होती.

  नवी दिल्ली: भारतात मान्यता देण्यात आलेली कोरोनाची तिसरी लस ‘स्पुतनिक व्ही’ लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. लसीचे सॉफ्ट लँच करण्यात आले असून, लसीचा पहिला डोस हैदराबादमध्ये दिल्याची माह‍िती डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजतर्फे देण्यात आली. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियन डायरेक्ट इनव्हेसमेंट फंडसोबत या लसीचे उत्पादन आणि विक्रीबाबत करार केला आहे. यासोबतच एकच डोस असलेली स्पुतनिक लाईट ही लसही जूनच्या अखेरपर्यंत भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. (Sputnik-V vaccine in India, ‘single dose’ will be coming soon)भारतात देशांतर्गत उत्पादन सुरू होईपर्यंत "स्पुतनिक व्ही" लस सुरूवातीच्या काळात आयात करण्यात येणार आहे. सर्वप्रथम दीड लाख डोसची पहिली खेप १ मे रोजी दाखल झाली होती. कसौली येथील केंद्रीय प्रयोगशाळेत तपासणी आणि चाचणी झाल्यानंतर लस वापरण्यास १३ मे रोजी मंजुरी देण्यात आली आहे. आता लस पुढील आठवड्यात बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. टप्प्याटप्प्याने होणार आयातसध्या लसीची आयात करण्यात येत आहे. ‘स्पुतनिक व्ही’ लसीचे पुढील दोन महिन्यांत ३.६ कोटी डोस मिळणे अपेक्षित असल्याची माहिती रमणा यांनी दिली. लसीची दुसरी खेपही शुक्रवारी दाखल झाली. ‘स्पुतनिक व्ही’ लस ९१ टक्के प्रभावी असल्याचे चाचण्यांमधून आढळले होते. भारतात ६ कंपन्यांसोबत रशियन डायरेक्ट इनव्हेटमेंट फंडने करार केले आहेत.

    देशात कोरोनाचे नवे रुग्ण, मृत्यूमध्ये घट- देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे नवे रुग्ण व मृत्यू यांच्यात घट झाली आहे. शुक्रवारी कोरोनाचे ३ लाख ४३ हजार नवे रुग्ण आढळून आले, तर ४ हजार जणांचा मृत्यू झाला. - कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ४० लाखांवर पोहोचली असून, त्यातील २ कोटी ७९ हजार लोक बरे झाले आहेत. गुरुवारी कोरोनाचे ३ लाख ४८ हजार नवे रुग्ण सापडले होते व ४२०५ जणांचा बळी गेला होता.

राज्यांना १.९२ कोटी डोस मिळणारकेंद्र सरकार रविवारी १६ मेपासून ते ३१ मेपर्यंतच्या पंधरवड्यात राज्यांना कोरोना लसींच्या १ कोटी ९२ लाख डोसचा मोफत पुरवठा करणार आहे, असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. 

देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ८३.२ टक्के रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांमध्ये आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरIndiaभारतrussiaरशिया