शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Sputnik V Price: मोठी बातमी! रशियाच्या Sputnik V लशीची किंमत जाहीर; एक डोस 995.40 रुपयांना मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 13:18 IST

Russia's Sputnik V vaccine Price in India: स्पुतनिक व्ही ही लस भारतात मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस आहे. ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. डॉ. रेड्डीजने आज हैदराबादमध्ये पहिला डोस दिल्याची माहिती दिली.

Russia's Sputnik V vaccine Price in India:   रशियाची कोरोना व्हायरसवरील लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) ची भारतातील किंमत (Indian Price declaired) जाहीर झाली आहे. रशियातून (Russia) आयात केलेली ही लस भारतात 995.40 रुपयांना प्रति डोस मिळणार आहे. डॉ. रेड्डीज ही औषधनिर्माता कंपनी रशियाची ही लस भारतात बनविणार असून मेक ईन इंडियाची ही लस आणखी स्वस्त मिळण्याची अपेक्षा आहे. (Sputnik V vaccine priced at Rs 995 per dose in India, first shot administered by Dr Reddy's in Hyderabad)

अदार पुनावालांना Covishield मालामाल करणार; सीरम इन्स्टिट्यूट किती फायद्यात? अंदाज पहा...

स्पुतनिक व्ही ही लस भारतात मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस आहे. ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. डॉ. रेड्डीजने आज हैदराबादमध्ये पहिला डोस दिल्याची माहिती दिली. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडद्वारे डॉ. रेड्डीजने रशियासोबत करार केला आहे. यानुसार या लशीचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. रशियातून आयात केलेल्या या स्पुतनिक व्ही लसीची किंमत 948 रुपये प्रति डोस आहे. परंतू त्यामध्ये 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे या लशीची किंमत 995.4 रुपये होत आहे. यामुळे 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा डोस उपलब्ध होणार आहे.

Corona Vaccination: मास्क नको, सोशल डिस्टन्सिंगही पाळू नका! लसीकरण झालेल्यांना अमेरिकेच्या नव्या गाईडलाईन

भारतात या लसीचे उत्पादन सुरु झाले की या लसीची किंमतही कमी होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने पुढील आठवड्यापासून स्पुतनिक लस देशभरातील बाजारांत उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले होते. भारतात सध्या देण्यात येत असलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनपेक्षा रशियाची लस जास्त परिणामकारक आहे. 

 

रशियात तयार झालेली स्पुतनिक लस पुढील आठवड्यात भारतीय बाजारांत उपलब्ध होईल. नीती आयोगाचे सदस्य असलेले डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबद्दलची माहिती दिली. जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्यानं विविध स्तरांवर काम करत आहोत. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत २१६ कोटी डोस उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. यामध्ये कोवॅक्सिनच्या ५५ कोटी डोस, कोविशील्डच्या ७५ कोटी डोस, बायो ई सब युनिट लसीचे ३० कोटी डोस, झायडस कॅडिलाचे ५ कोटी डोस, नोवावॅक्सिनचे २० कोटी डोस, भारत बायोटेकच्या नेझल लसीचे १० कोटी डोस, जिनोवाचे ६ कोटी डोस आणि स्पुटनिकच्या १५ कोटी डोसचा समावेश असेल. याशिवाय आणखी देशांमधील लसीदेखील भारतात येतील, अशी माहिती पॉल यांनी दिली. 

 

टॅग्स :russiaरशियाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस