क्रीडा : तायक्वोंदोमध्ये ‘साई’चे खेळाडू चमकले
By Admin | Updated: August 3, 2015 22:31 IST2015-08-03T22:31:27+5:302015-08-03T22:31:27+5:30
कुंभारजुवे : फोंडा येथे आयोजित तीन गटांतील ‘तायक्वोंदो चॅम्पियनशिप 2015’मध्ये माशेलच्या साई तायक्वोंदो अकादमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळविले. या स्पर्धेत अकादमीच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण, पाच रौप्य व तीन कांस्य पदके मिळविली आहेत.

क्रीडा : तायक्वोंदोमध्ये ‘साई’चे खेळाडू चमकले
क ंभारजुवे : फोंडा येथे आयोजित तीन गटांतील ‘तायक्वोंदो चॅम्पियनशिप 2015’मध्ये माशेलच्या साई तायक्वोंदो अकादमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळविले. या स्पर्धेत अकादमीच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण, पाच रौप्य व तीन कांस्य पदके मिळविली आहेत.अकादमीचे प्रशिक्षक आनंद तारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ गटात प्रणिता तारी यांनी सुवर्ण, वैभवी प्रियोळकर व वैष्णवी भगत यांनी रौप्य तर केमलिन फर्नांडिस यांनी कांस्यपदक प्राप्त केल़े कनिष्ठ गटात प्रणिता तारी यांनी सुवर्ण, जगदीश साहू यांनी रौप्य तर प्रतिमा घाडी यांनी कांस्यपदक मिळविले आहे. कॅडेट गटातून मनोग्या नार्वेकर व अग्निका पटेल यांनी रौप्य तर समृद्धी पावसकर यांना कांस्यपदक मिळाले आहे. अकादमीतर्फे यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. (प्रतिनिधी)ओळी : माशेलच्या साई तायक्वोंदो अकादमीचे यशस्वी खेळाडू़ सोबत प्रशिक्षक आनंद तारी. (छाया : नरसिंह प्रभू)