तोरसेत आहार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:48+5:302015-05-05T01:21:48+5:30
हणखणे : पूर्वा-कासारवर्णे येथील आरोग्य केंद्रातर्फे युवक आणि मातांसाठी आहारासंबंधी मार्गदर्शन शिबिर तोरसे येथे आयोजित करण्यात आले होते. आरोग्याधिकारी डॉ. विल्फ्रेड मिरांडा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी व्यासपीठावर आहारतज्ज्ञ डॉ. गंधाली उमर्ये, डॉ. श्वेतलाना कांबळी, आरोग्य निरीक्षक संतोष शेटकर, रवींद्र खोलकर, राजू नाईक, आनंद पार्सेकर, स्मिता हणजूणकर उपस्थित होते.

तोरसेत आहार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
ह खणे : पूर्वा-कासारवर्णे येथील आरोग्य केंद्रातर्फे युवक आणि मातांसाठी आहारासंबंधी मार्गदर्शन शिबिर तोरसे येथे आयोजित करण्यात आले होते. आरोग्याधिकारी डॉ. विल्फ्रेड मिरांडा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी व्यासपीठावर आहारतज्ज्ञ डॉ. गंधाली उमर्ये, डॉ. श्वेतलाना कांबळी, आरोग्य निरीक्षक संतोष शेटकर, रवींद्र खोलकर, राजू नाईक, आनंद पार्सेकर, स्मिता हणजूणकर उपस्थित होते. डॉ. गंधाली उमर्ये म्हणाल्या की, आपले आरोग्य योग्य तर्हेने सांभाळणे ही प्रत्यकाची जबाबदारी असते. त्यासाठी पोषक आहार घ्यावा. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. कुठलाही आहार योग्य प्रमाणात घ्यावा. तसेच शिजवलेले पोषक अन्न सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. आरोग्याधिकारी डॉ. विल्फ्रेड मिरांडा यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन व आभार आरोग्य निरीक्षक संतोष शेटकर यांनी मानले. (प्रतिनिधी)