सपाला मत न देणारे मुसलमान नव्हेत - आझमी
By Admin | Updated: May 2, 2014 15:29 IST2014-05-02T15:29:10+5:302014-05-02T15:29:45+5:30
समाजवादी पार्टीला मत न देणारे मुस्लीम मतदार हे खरे मुसलमानच नव्हेत, असे वक्तव्य करून समाजवादी पार्टीचे नेते अबू असीम आझमी यांनी पुन्हा एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.

सपाला मत न देणारे मुसलमान नव्हेत - आझमी
अबू आझमी यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
संत कबीरनगर/पाटणा : समाजवादी पार्टीला मत न देणारे मुस्लीम मतदार हे खरे मुसलमानच नव्हेत, असे वक्तव्य करून समाजवादी पार्टीचे नेते अबू असीम आझमी यांनी पुन्हा एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. तर राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा निशाणा साधत ‘त्यांना पाकिस्तानात पाठविले पाहिजे,’ असे म्हटले आहे. त्यावरूनही भाजपात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. खालिदाबाद येथील प्रचारसभेत सपाचे आझमी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुलायमसिंह यादव यांनी मुसलमानांसाठी काय केले नाही, असा सवाल करून, जी मुस्लिम व्यक्ती समाजवादी पार्टीला मत देणार नाही तिची ‘डीएनए’ चाचणी करायला हवी व संघाशी संबंध आहेत का ते तपासायला हवे, असेदेखील ते म्हणाले.