शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

हृदयद्रावक! 11 महिन्यांच्या बाळाला दुर्मिळ आजार; जीव वाचवण्यासाठी हवंय 17.50 कोटींचं इंजेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 12:50 IST

अवघ्या 11 महिन्यांच्या वयात आजार झाला आहे, ज्यामध्ये स्नायू कमकुवत होण्यासोबतच श्वास घेणं कठीण होत आहे.

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एक बाळ अत्यंत दुर्मिळ आजाराशी लढाई लढत आहे. अवघ्या 11 महिन्यांच्या वयात त्याला आजार झाला आहे, ज्यामध्ये स्नायू कमकुवत होण्यासोबतच श्वास घेणं कठीण होत आहे. आयकर विभागातील टॅक्स असिस्टेंट अमित यांचा 11 महिन्यांचा मुलगा कणव हा स्पायनल मस्कुलर ऍट्रोफी 1 (SMA 1) या गंभीर आजाराने त्रस्त आहे. मुलाच्या उपचारासाठी 17.50 कोटी रुपयांच्या इंजेक्शनची गरज आहे, त्यासाठी पालक निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. 

कणवचे वडील अमित यांनी आपल्या काळजाच्या तुकड्याचा जीव वाचवण्यासाठी देशासमोर हात पसरले आहेत. 17 कोटींचा डोंगर उभा करणे सामान्य माणसाला जवळपास अशक्य आहे. मुलाचे पालक पैसे कुठून आणणार या चिंतेत दिवसरात्र घालवत आहेत. अमित यांना आशा आहे की केवळ नोएडाच नाही तर इतर शहरातील लोकही त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी मदतीसाठी नक्कीच पुढे येतील. मुलाच्या कुटुंबाची असहायता पाहून राजकारण्यांनीही सोशल मीडियावर भावनिक आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनीही लोकांना मदतीचे आवाहन केले आहे.

अमित यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे कुटुंब नजफगडमध्ये राहते. काही दिवसांपूर्वी गंगाराम रुग्णालयात मुलाचा आजाराबाबत समजलं. त्यानंतर एम्समध्येही तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये या आजाराची पुष्टी झाली. सध्या मुलावर फिजिओथेरपी सुरू आहे. त्याचवेळी सहकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन अमित यांच्या मुलाच्या उपचारासाठी शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

हा एक दुर्मिळ आजार आहे. याचा त्रास झाल्यास मुलाचे स्नायू कमकुवत होतात. शरीरात पाणी कमी असते. श्वास घेण्यासही त्रास होतो. मुलाचे शरीर मुलाचे शरीर पूर्णपणे निष्क्रिय होऊ लागते. या आजारामुळे मुलांच्या पाठीच्या कण्यातील चेतापेशींचे नुकसान होते. आम आदमी पक्षानेही सर्वसामान्यांना क्राउडफंडिंगचे आवाहन केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Healthआरोग्यMONEYपैसा