पैशासाठी मकडी फेम श्वेता बसू प्रसाद देहविक्रीच्या व्यवसायात

By Admin | Updated: September 3, 2014 17:43 IST2014-09-03T17:24:46+5:302014-09-03T17:43:35+5:30

मकडी, इक्बाल या चित्रपटांमधून बॉलीवूडमध्ये छाप पाडणारी अभिनेत्री श्वेता बासूप्रसादला देहविक्रीप्रकरणी अटक करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.

Spider fame for money Shveta Basu Prasad in Dehiqui's business | पैशासाठी मकडी फेम श्वेता बसू प्रसाद देहविक्रीच्या व्यवसायात

पैशासाठी मकडी फेम श्वेता बसू प्रसाद देहविक्रीच्या व्यवसायात

>ऑनलाइन लोकमत
हैद्राबाद,दि. ३ - मकडी, इक्बाल या चित्रपटांमधून बॉलीवूडमध्ये छाप पाडणारी अभिनेत्री श्वेता बासूप्रसादला देहविक्रीप्रकरणी अटक करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. हैदराबादच्या पॉश हॉटेलमध्ये चाललेल्या वेश्याव्यवसाचा भांडाफोड पोलीसांनी केला असून श्वेतासह अनेक बड्या उद्योजकांनाही अटक केली आहे.
२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या मकडी या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारणा-या श्वेताला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मकडीनंतर इक्बाल या चित्रपटात तिने श्रेयस तळपदेच्या बहिणीची छोटेखानी पण महत्त्वाची भूमिका केली होती. चित्रपटांशिवाय एकता कपूरच्या कहानी घर घर की या मालिकेतही तिने काम केले होते. बॉलीवूडनंतर तेलगू सिनेसृष्टीत काम करण्यासाठी श्वेताने हैद्राबाद गाठले. मात्र तेलगू सिनेमांमध्ये ती फारशी चमकली नाही. दोन दिवसांपूर्वी हैद्राबाद पोलिसांनी बंजारा हिल्स या हॉटेलमध्ये धाड टाकून देहविक्री करणा-या महिलांवर कारवाई केली. या महिलांमध्ये अभिनेत्री श्वेता बासूप्रसादचा समावेश आहे.
या घटनेनंतर श्वेताना पत्रक काढून परिस्थितीमुळे आपल्याला वेश्याव्यवसाय करावा लागल्याचे म्हटले आहे. कुटुंब चालवण्यासारखी चांगली कामं करण्यासाठी आपण हा पेशा स्वीकारला असून आपल्याप्रमाणेच अनेक अन्य कलाकारांवरही ही वेळ ओढवल्याचे तिने नमूद केले आहे. 
 

Web Title: Spider fame for money Shveta Basu Prasad in Dehiqui's business