शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रंगपंचमीला स्पाइस जेटच्या विमानात कर्मचाऱ्यांनी 'बलम पिचकारी' गाण्यावर केला डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 23:02 IST

रंगपंचमीच्या दिवशी हवाई प्रवास करणारे प्रवाशी सणाच्या आनंदापासून वंचित राहाणार नाहीत याची काळजी देशातील विमान कंपन्यांनी घेतली.

ठळक मुद्देदिल्लीच्या टी-1डी एअरपोर्टवर भांगडा तसेच डिजे बॅली सागू आणि पंजाबी गायक जॅझ धामीच्या गाण्यांवर प्रवाशांची पावले थिरकत होती. स्पाइस जेटच्या कर्मचाऱ्यांनी अरबन सिंगच्या डान्स ग्रुपसह धमाकेदार डान्सही केला.

मुंबई - रंगपंचमीच्या दिवशी हवाई प्रवास करणारे प्रवासी सणाच्या आनंदापासून वंचित राहाणार नाहीत याची काळजी देशातील विमान कंपन्यांनी घेतली. स्पाइस जेटने दिल्ली विमानतळावर म्युझिक शो ठेवला होता, तर इंडिगोने विमानात येणाऱ्या प्रवाशांना रंग लावले. टाटा-सिंगापूर एअरलाईन्सच्या विस्ताराने प्रवाशांसाठी होळीच्या निमित्ताने जेवणामध्ये विशेष मेन्यू ठेवला होता.  

दिल्लीच्या टी-1डी एअरपोर्टवर भांगडा तसेच डिजे बॅली सागू आणि पंजाबी गायक जॅझ धामीच्या गाण्यांवर प्रवाशांची पावले थिरकली असे स्पाइस जेटने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार म्हटले आहे.  स्पाइस जेटच्या क्रू आणि कर्मचाऱ्यांनी विमानात 'बलम पिचकारी' या बॉलिवूडमधील गाण्यावर विमानात डान्सही केला. स्पाइस जेटच्या कर्मचाऱ्यांनी अरबन सिंगच्या डान्स ग्रुपसह धमाकेदार डान्सही केला. यावेळी प्रवाशीही त्यांच्यासोबत सहभागी झाले होते. संजीव कपूर स्पाइस जेटमध्ये असताना होळीच्या दिवशी बॉलिवूडमधील गाण्यावर डान्सची पद्धत सुरु झाली. संजीव कपूर आता विस्तारामध्ये मुख्य व्यावसायिक अधिकारी आहेत. 

 

केबिन क्रू च्या अशा प्रकारे डान्स करण्यावरुन त्यावेळी वादही झाला होता. डीजीसीएने चिंताही व्यक्त केली होती. विमानातील अशा प्रकारच्या सेलिब्रेशनचे महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी कौतुक केले आहे. त्यांनी टि्वटरव व्हिडिओ अपलोड केला आहे. स्पाइस जेट तुम्ही तुमच्या प्रवाशांच्या आयुष्यात रंग भरले. थोडीशी मस्ती, थोडासा धमाका, आपण सर्वांनी हे उदहारण आचरणात आणले तर आयुष्य अधिक रंगतदार होईल. प्रत्येक दिवस होळीसारखा असेल असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :spicejetस्पाइस जेट