पवन देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘इतर’ ‘इतर’ खर्चावर नियंत्रण आणून बचत करण्यावर भर असणाऱ्या भारतीयांचा खर्चाचा ट्रेंड बदलला आहे. फास्ट फूड, पॅकेज्ड फूड, कोल्ड्रिंक्ससारख्या गोष्टींवर अधिक खर्च होऊ लागला आहे. दुग्धजन्य पदार्थांवर कमी खर्च केला जात आहे.
केंद्रीय सांख्यिकी खात्याने जाहीर केलेल्या अहवालानुसार, फास्टफुड, कोल्ड्रिंक्ससारख्या गोष्टींवर होणारा इतर खर्च २४% वाढला असून, भाजीपाल्यावर होणारा खर्च मात्र ११% घटला आहे.
ग्रामीण भागात उपभोग्य वस्तूंवरील दरडोई खर्च
इतर खर्च कशावर किती?
- वाहतूक ७.५९%
- वैद्यकीय खर्च ६.८३%
- कपडे, पादत्राणे ६.६३%
- टिकाऊ वस्तू ६.४८%
- मनोरंजन ६.२२%
- वाहतूक ८.४६%
- विविध वस्तू आणि मनोरंजन ६.९२%
- टिकाऊ वस्तू ६.८७%
- भाडे ६.५८%
- शिक्षण ५.९७%