बिलासपूरवरून बिकानेर, भगत की कोठी विशेष रेल्वेगाड्या
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:06+5:302015-08-02T22:55:06+5:30
बिलासपूरवरून बिकानेर, भगत की कोठी विशेष रेल्वेगाड्या

बिलासपूरवरून बिकानेर, भगत की कोठी विशेष रेल्वेगाड्या
ब लासपूरवरून बिकानेर, भगत की कोठी विशेष रेल्वेगाड्याप्रवाशांसाठी सुविधा : नागपूर मार्गे धावणारनागपूर : प्रवाशांची प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने बिलासपूर-बिकानेर दरम्यान नागपूर मार्गे दोन विशेष रेल्वेगाड्या तसेच बिलासपूर-भगत की कोठी दरम्यान नागपूर मार्गे दोन रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.बिलासपूर-बिकानेर गाडीचे वेळापत्रकरेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०८२४५ बिलासपूर-बिकानेर ही विशेष रेल्वेगाडी गुरुवारी ६ ऑगस्ट २०१५ रोजी सायंकाळी ६.०५ वाजता सुटून बिकानेरला तिसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वाजता पोहोचेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी ७ ऑगस्टला नागपुरात मध्यरात्री १.०७ वाजता, पांढुर्णाला २.५३ वाजता येईल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०८२४६ ही गाडी ८ ऑगस्टला रात्री ११.३० वाजता सुटून बिलासपूरला तिसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी १० ऑगस्टला सोमवारी पांढुर्णाला मध्यरात्री २.४४ वाजता आणि नागपूरला पहाटे ४.४० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना भाटपारा, रायपूर, भिलाई, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, पांढुर्णा, इटारसी, हबीबगंज, भोपाळ, सिहोर येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यात एकूण १८ कोच असून २ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ५ स्लिपर, ६ साधारण द्वितीयश्रेणी, २ एसएलआर कोच आहेत. बिलासपूर-भगत की कोठी गाडीचे वेळापत्रकरेल्वेगाडी क्रमांक ०८२४३ बिलासपूर-भगत की कोठी ही विशेष रेल्वेगाडी मंगळवारी ४ ऑगस्टला सायंकाळी ६.०५ वाजता सुटून भगत की कोठी येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ५.१० वाजता पोहोचेल. ही गाडी ५ ऑगस्टला नागपुरात रात्री १.१० वाजता, पांढुर्णाला रात्री २.५३ वाजता पोहोचेल. ०८२४४ भगत की कोठी-बिलासपूर विशेष रेल्वेगाडी शनिवारी ८ ऑगस्टला बिलासपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी ९ ऑगस्टला रविवारी पांढुर्णाला रात्री २.४४, नागपूरला पहाटे ४.४० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना भाटापारा, रायपूर, भिलाई, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, पांढुर्णा, इटारसी, हबीबगंज, भोपाळ, सिहोर, शुजालपूर, बरछा, उज्जैन, नागदा, शामगढ, , भवानीमंढी, कोटा, इंदरगड, सवाईमाधोपूर, बन्सथली निवाई, दुर्गापुरा, जयपूर, फुलेरा, कुचामन सिटी, मकराना, देगाना, मेरटा रोड, गोटान, जोधपूर येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यात एकुण १८ कोच असून २ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ५ स्लिपर, ६ साधारण द्वितीयश्रेणी, २ एसएलआर कोच आहेत. (प्रतिनिधी)................