शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात वॉरंट जारी, NIA कोर्टाने अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 14:42 IST

Malegaon 2008 Blasts Case : खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत.

मुंबई : मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात खटल्याची सुनावणी झाली. भोपाळमधील भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विरोधात कोर्टाने 10,000 रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. खासदार प्रज्ञा सिंह ठाकूरमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असून कोर्टाच्या आदेशानंतरही त्या सुनावणीसाठी हजर झाल्या नव्हत्या. 

खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना कोर्टाने हजर राहण्यास सांगितले होते. यासंदर्भात आदेश देऊनही त्या कोर्टात हजर राहिल्या नाहीत. दरम्यान, खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वकिलाने प्रकृतीच्या कारणास्तव हजर राहण्यापासून सूट मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता, परंतु कोर्टाने तो फेटाळला आणि जामीनपात्र वॉरंट जारी केले, जे 20 मार्च रोजी परत केले जाऊ शकते.

दरम्यान, 2008 मध्ये महाराष्ट्रातील मालेगाव शहरात एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले. दरम्यान, या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसकडून करण्यात आला. त्यानंतर नंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले होते. याप्रकरणी 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जामीन मंजूर केला होता. 

भाजपाने तिकीट कापलेदुसरीकडे, 2 मार्च रोजी भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील एकूण 29 लोकसभा जागांपैकी 24 उमेदवारांचाही समावेश आहे. यात भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे तिकीट भाजपाने कापले आहे. त्यांच्या जागी भोपाळचे माजी महापौर आलोक शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाMalegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोट