धर्मनिरपेक्ष विवाहासाठी विशेष वेबसाईट माकपचा पुढाकार
By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:36+5:302014-12-18T22:39:36+5:30
तिरुवनंतपुरम-धर्मनिरपेक्ष विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी माकप (एम) मधील डेमॉक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या युवकांच्या संघटनेने एका विवाह जुळवणी वेबसाईटची निर्मिती केली आहे.

धर्मनिरपेक्ष विवाहासाठी विशेष वेबसाईट माकपचा पुढाकार
त रुवनंतपुरम-धर्मनिरपेक्ष विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी माकप (एम) मधील डेमॉक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या युवकांच्या संघटनेने एका विवाह जुळवणी वेबसाईटची निर्मिती केली आहे.डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सेक्युलरमॅरेज डॉट कॉम असे नाव असलेल्या या वेबसाईटवर पंथ, जातपात व धर्म यांच्या बंधनांपलिकडे जाऊन लग्न करू इच्छिणाऱ्यांना त्यांच्याच विचारसरणीचे जोडीदार शोधता येणार आहेत. या वेबसाईटवर वर वा वधूच्या माहितीमध्ये त्यांची जात वा धर्म यांचा उल्लेख करण्याचे कुठलेच कलम समाविष्ट करण्यात आलेले नाही. विवाह हे अधिक धार्मिक व जातीय होत जाण्याच्या काळात ही वेबसाईट एक धर्मनिरपेक्ष वातावरण तयार करेल असा विश्वास या संघटनेने व्यक्त केला आहे. या वेबसाईटचे लोकार्पण कोच्ची येथे दिग्दर्शक आशिक अबू व अभिनेत्री रीमा कलिंगल यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र काही कट्टरवादी गटांनी ती हॅक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे डीवायएफआयचे सचिव एम. स्वराज यांनी सांगितले आहे.