विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
वडापुरी : येथे ग्राम उदय से भारत उदय अभियानांतर्गत विशेष ग्रामसभेचे श्रीनाथ मंदिरामध्ये आयोजन करण्यात आले. या अभियानांतर्गत असलेल्या सर्व योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते.
विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती
वडापुरी : येथे ग्राम उदय से भारत उदय अभियानांतर्गत विशेष ग्रामसभेचे श्रीनाथ मंदिरामध्ये आयोजन करण्यात आले. या अभियानांतर्गत असलेल्या सर्व योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते. वडापुरी येथील श्रीनाथ मंदिरामध्ये आज या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्रशासक एस. व्ही. भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी ग्रामविकास अधिकारी एस. एम. भिलारे यांनी ग्राम उदय से भारत उदय अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच गावातील करवसुली आढावा, नवीन दराने कर आकारणी, स्व. भारत मिशन अभियानाबाबत माहिती, जिल्हा परिषद, पंचायत समितीकडील महिला बालकल्याण, समाजकल्याण विशेष घटक योजना, वैयक्तिक लाभार्थी निवडणे, गावातील सध्या असलेली पाणीटंचाई याबाबत ग्रामसभेत विषय घेण्यात आले होते. या वेळी विविध योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी शांताबाई चंदनशिवे, शिवाजी तरंगे, विकास गायकवाड, भारत चंदनशिवे, प्रमोद बोधले, शत्रुघ्न बागल आदी उपस्थित होते. इंदापुर पानासाठी...