'स्पाईसजेट'ची खास दिवाळी ऑफर, ७४९ रूपयांत देशांतर्गत प्रवास
By Admin | Updated: October 27, 2015 17:08 IST2015-10-27T17:08:47+5:302015-10-27T17:08:47+5:30
देशात आणि विदेशात हवाई उड्डान करणा-यांसाठी एक खुश खबर आहे. 'स्पाईसजेट' विमान कंपनीकडून दिवाळीसाठी खास 'दिवाळी सेल धमाका' अशी ऑफर सादर करण्यात आली आहे.

'स्पाईसजेट'ची खास दिवाळी ऑफर, ७४९ रूपयांत देशांतर्गत प्रवास
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - देशात आणि विदेशात हवाई उड्डान करणा-यांसाठी एक खुश खबर आहे. 'स्पाईसजेट' विमान कंपनीकडून दिवाळीसाठी खास 'दिवाळी सेल धमाका' अशी ऑफर सादर करण्यात आली आहे.
‘स्पाईसजेट’च्या या ऑफरमध्ये अवघ्या ७४९ रूपयांत देशांतर्गत आणि ३,९९९ रूपयांत विदेशात प्रवास करण्याची संधी देण्यात आली आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी २७ ते २९ ऑक्टोबर या तीन दिवसांमध्ये बुकींग करावे लागणार आहे. तसेच, या कालावधीत बुकींग केलेल्या तिकिटांमध्ये १ फेबुवारी २०१६ ते २९ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत देशांतर्गत आणि विदेशातील सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. याचबरोबर 'स्पाईसजेट' विमान कंपनीकडून ही वन-वे ऑफर असून देशातील सर्व मेट्रो शहरे आणि देशातील काही प्रमुख पर्यटनस्थळांसाठी लागू करण्यात आली आहे.