डिंगोरे येथील गणेशमूर्तींना विशेष मागणी
By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:34+5:302015-08-19T22:27:34+5:30
ओतूर : राष्ट्रीय महामार्ग २२२ नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे येथील महिला गणेशमूर्तिकार अरुणा सोनवणे या १५ वर्षांपासून गणेशमूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत. त्यांनी या वर्षी बनविलेल्या गणेशमूर्तींना रंग देण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, नाशिक, नवी मुंबई, संपूर्ण जुन्नर तालुक्यातून विशेष मागणी असल्याने सध्या रंगकामाची लगबग सुरू आहे.

डिंगोरे येथील गणेशमूर्तींना विशेष मागणी
ओ ूर : राष्ट्रीय महामार्ग २२२ नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे येथील महिला गणेशमूर्तिकार अरुणा सोनवणे या १५ वर्षांपासून गणेशमूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत. त्यांनी या वर्षी बनविलेल्या गणेशमूर्तींना रंग देण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, नाशिक, नवी मुंबई, संपूर्ण जुन्नर तालुक्यातून विशेष मागणी असल्याने सध्या रंगकामाची लगबग सुरू आहे.डिंगोरे येथील अरुणा संतोष सोनवणे या पदवीधर आहेत; परंतु नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वत:चा पिढीजात गणेशमूर्ती बनविण्याचे काम घरकाम सांभाळून करतात. अरुणा सोनवणे या स्वत: कलाकार असल्याने ६ इंचांपासून ६ फूट उंचीच्या गणेशमूर्ती बनवतात. सोनवणे यांनी त्यांच्या कारखान्यात लालबागचा राजा, चिंचपोकळी आदी गणेशमूर्ती विविध आकारांत बनवल्या आहेत.०००