शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पी. चिदंबरम यांना कोर्टाचा दणका, कोठडी 2 सप्टेंबरपर्यंत वाढवली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 16:36 IST

कथित आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांना  कोर्टाने आज मोठा धक्का दिला.

नवी दिल्ली - कथित आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांना  कोर्टाने आज मोठा धक्का दिला. चिदंबरम यांना आज न्यायालयात हजर केले असता सीबीआय कोर्टाने त्यांच्या कोठडीत वाढ करत त्यांना 2 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

 सीबीआयने पी. चिदंबरमय यांच्या कोठडीत पाच दिवसांनी वाढ करण्याची मागणी राउज एव्हेन्यू कोर्टाकडे केली होती. माजी केंद्रीय मंत्री असलेले चिदंबरम हे तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा तसेच विचारलेल्या प्रश्नांची स्वैर उत्तरे देत असल्याचे सीबीआयने कोर्टात सांगितले. तसेच चिदंबरम आणि इतर आरोपींची एकदा समोरासमोर चौकशी करण्याची गरज असल्याचेही सीबीआयने कोर्टात सांगितले.

दरम्यान, अटक केल्यापासून आतापर्यंत चिदंबरम यांना 44 प्रश्न विचारण्यात आले, असे चिदंबरम यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. यावेळी चिदंबरम यांच्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी पाच दिवसांची कोठडी का मागता. एकदम 15 दिवसांची कोठडी का मागत नाही? अशा शब्दात कोर्टाने सीबीआयला फटकारले. यापूर्वी चिदंबरम यांना 26 ऑगस्ट रोजी 4 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. 

दरम्यान, ॉआयएनएक्स मीडियाप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना काल सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला होता. चिदंबरम यांना येत्या ५ सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिले होते. या प्रकरणी येत्या ५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.  आएनएक्स मीडिया आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पी. चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी त्यांना अटक करण्याची मुभा देण्यासाठी ईडीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने चिदंबरम यांना ५ सप्टेंबरपर्यंत दिलासा देत त्यांच्या अटकेला ईडीला मनाई केली आहे.  

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमCBIगुन्हा अन्वेषण विभागCourtन्यायालय