करिया मुंडा होणार लोकसभा अध्यक्ष
By Admin | Updated: May 22, 2014 05:23 IST2014-05-22T05:23:16+5:302014-05-22T05:23:16+5:30
वरिष्ठ आदिवासी नेते आणि १५ व्या लोकसभेतील उपाध्यक्ष करिया मुंडा यांना पुढील लोकसभा अध्यक्ष म्हणून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

करिया मुंडा होणार लोकसभा अध्यक्ष
नवीन सिन्हा, नवी दिल्ली - वरिष्ठ आदिवासी नेते आणि १५ व्या लोकसभेतील उपाध्यक्ष करिया मुंडा यांना पुढील लोकसभा अध्यक्ष म्हणून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मुंडा हे १९७७ मध्ये राज्यमंत्री आणि त्यानंतर वाजपेयी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. परंतु २००० मध्ये लालकृष्ण आडवाणी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांच्याऐवजी बाबूलाल मरांडी यांना झारखंडचे मुख्यमंत्री बनविण्यात आले. नरेंद्र मोदींनी मुंडा यांना लोकसभा अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. मुंडा हे झारखंडमधून आठवेळा निवडून आले आहेत. त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. कोळसामंत्री असताना त्यांनी कोल इंडियाच्या कलंकित अध्यक्षाला बडतर्फ केले होते आणि त्यांना परत घेण्यास नकार दिला होता. यामुळे आडवाणी क्षुब्ध झाले आणि मुंडा यांना मंत्रिपद गमवावे लागले होते. मुंडा यांना सरकारमध्ये सन्मानाचे स्थान देण्याची मागणी झारखंडचे सात खासदार आणि रा. स्व. संघाच्या अनेक नेत्यांची होती. मुंडा यांनी तर्कवितर्कावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. कधीही कोणत्याही पदासाठी लॉबिंग केले नाही आणि करणार नाही. पक्ष आणि नेतृत्वावर ते अवलंबून आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचा आनंद आहे. ते देशाला स्थिर सरकार देतील, असे ते म्हणाले.