लोकसभाध्यक्षांनी कान टोचले

By admin | Published: July 10, 2014 02:11 AM2014-07-10T02:11:44+5:302014-07-10T02:11:44+5:30

दु:खी झालेल्या लोकसभा अध्यक्ष सुमित्र महाजन यांनी काही सदस्यांच्या वर्तणुकीबद्दल त्यांचे कान टोचले.

The Speaker chanted the ear | लोकसभाध्यक्षांनी कान टोचले

लोकसभाध्यक्षांनी कान टोचले

Next
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेस सदस्यांकडून वारंवार होत असलेला गोंधळ आणि त्यांचे लोकसभा अध्यक्षांना तुम्ही नरेंद्र मोदींचे लोकसभा अध्यक्ष नाहीत, असे सांगणो. यामुळे दु:खी झालेल्या लोकसभा अध्यक्ष सुमित्र महाजन यांनी काही सदस्यांच्या वर्तणुकीबद्दल त्यांचे कान टोचले. आसनाचा सन्मानदेखील करायचा नसेल तर ती आणखी गंभीर बाब आहे, असेही त्यांनी स्पष्टपणो नमूद केले.
काही सदस्यांच्या बेलगाम वागणुकीने सभागृहाच्या सन्मानाला धक्का पोहोचला आहे. जे काही घडले ते अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे, असे त्या म्हणाल्या. सभागृहात मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर तृणमूल काँग्रेस  सदस्य तसेच इतर विरोधी पक्षांचे सदस्य त्यास 
विरोध करीत होते. अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणा देत होते. (लोकमत न्यूज नेटवर्क) 
 
बॅनर्जी यांचा माफीनामा
च्लोकसभा अध्यक्ष सुमित्र महाजन यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिपणी केल्याबद्दल तृणमूल काँग्रेस सदस्य कल्याण बॅनर्जी यांनी बुधवारी सभागृहात माफी मागितली. 
च्बॅनर्जी यांनी काल प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान गदारोळ सुरू असताना ‘सुमित्र महाजन भाजपा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा अध्यक्ष नाहीत’, अशी टिपणी केली होती.

 

Web Title: The Speaker chanted the ear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.