जयललितांबद्दल बोलल्यास जीभ छाटू
By Admin | Updated: July 21, 2015 00:25 IST2015-07-21T00:25:24+5:302015-07-21T00:25:24+5:30
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि सत्ताधारी अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्या आरोग्याबद्दल कुणी अवाक्षरही काढले तर खबरदार!

जयललितांबद्दल बोलल्यास जीभ छाटू
नमक्कल : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि सत्ताधारी अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्या आरोग्याबद्दल कुणी अवाक्षरही काढले तर खबरदार! त्यांची जीभ छाटू, अशी धमकी या पक्षाच्या एका खासदाराने दिल्याने खळबळ उडाली आहे.
स्वपक्षीय नेत्यांनीच या खासदाराचे कान उपटले. अद्रमुकची एक परंपरा असून सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाची प्रतिष्ठा कायम राखली पाहिजे, असा सल्ला दिला आहे.