रामानंदनगर पोलीस स्टेशनसाठी जागेची मागणी
By Admin | Updated: February 2, 2016 00:15 IST2016-02-02T00:15:05+5:302016-02-02T00:15:05+5:30
जळगाव- रामानंदनगर पोलीस स्टेशनसाठी गिरणा पाण्याच्या टाकीजवळ, म्युन्सीपल कॉलनीसमोरील मेहरूण गट नं.४८३/२ ही ४७ आर जागा पोलीस प्रशासनाने मनपाकडे मागितली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्यात रामानंदनगर पोलीस स्टेशन हे १५ ऑगस्ट २०१३ मध्ये कोल्हेनगर येथे भाड्याच्या घरात सुरू झाले असून अद्याप स्वमालकीची जागा उपलब्ध झालेली नाही. गिरणा पाण्याच्या टाकीजवळील गट नं.४८३/२ ही जागा पोलीस स्टेशनसाठी मिळाल्यास तेथून पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व भागावर लक्ष ठेवणे तसेच गुन्ांवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. त्यामुळे ही जागा रामानंदनगर पोलीस स्टेशनला देण्याची मागणी केली आहे.

रामानंदनगर पोलीस स्टेशनसाठी जागेची मागणी
ज गाव- रामानंदनगर पोलीस स्टेशनसाठी गिरणा पाण्याच्या टाकीजवळ, म्युन्सीपल कॉलनीसमोरील मेहरूण गट नं.४८३/२ ही ४७ आर जागा पोलीस प्रशासनाने मनपाकडे मागितली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्यात रामानंदनगर पोलीस स्टेशन हे १५ ऑगस्ट २०१३ मध्ये कोल्हेनगर येथे भाड्याच्या घरात सुरू झाले असून अद्याप स्वमालकीची जागा उपलब्ध झालेली नाही. गिरणा पाण्याच्या टाकीजवळील गट नं.४८३/२ ही जागा पोलीस स्टेशनसाठी मिळाल्यास तेथून पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व भागावर लक्ष ठेवणे तसेच गुन्ांवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. त्यामुळे ही जागा रामानंदनगर पोलीस स्टेशनला देण्याची मागणी केली आहे.