निवडणूक जिंकल्याच्या उत्साहात सपा कार्यकर्त्यांचा हवेत गोळीबार,मुलाचा गेला जीव

By Admin | Updated: February 8, 2016 10:52 IST2016-02-08T10:50:04+5:302016-02-08T10:52:34+5:30

उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीतील विजयानंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात केलेल्या गोळीबारात एका ९ वर्षांच्या मुलाच जीव गेला.

The SP workers fired in the air with the zeal of winning the election, boy's life | निवडणूक जिंकल्याच्या उत्साहात सपा कार्यकर्त्यांचा हवेत गोळीबार,मुलाचा गेला जीव

निवडणूक जिंकल्याच्या उत्साहात सपा कार्यकर्त्यांचा हवेत गोळीबार,मुलाचा गेला जीव

>ऑनलाइन लोकमत
शामली (उत्तर प्रदेश), दि. ८ - उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीतील विजयानंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात केलेला गोळीबार एका ९ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला. या गोळीबारात त्या मुलाचा मृत्यू झाला. 
मिळालेल्या माहितीनुसार, शामली जिल्ह्यातील नफीसा येथे पार पडलेल्या स्थानिक निवडणुकीत समाजवादी पक्षाने विजय मिळवला, हे कळताच सपाच्या कार्यकर्त्यांनी हवेत गोळीबार करण्यास सुरवात केली. सुमारे अर्धा तास हा गोळीबार सुरू होता. त्याचवेळी रिक्षातून जाणा-या एका ९ वर्षांच्या मुलाला ही गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाटी तातीडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेनंतर मुलाच्या नातेवाईकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत पानीपत-खातीम महामार्ग रोखून धरला. दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली आलेली नाही. 

Web Title: The SP workers fired in the air with the zeal of winning the election, boy's life