सपाला मजबुती, काँग्रेसला संजीवनी
By Admin | Updated: January 24, 2017 00:51 IST2017-01-24T00:51:11+5:302017-01-24T00:51:11+5:30
उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी व काँग्रेस पक्षाने अनुक्रमे २९८ व १0५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय झाल्यानंतर

सपाला मजबुती, काँग्रेसला संजीवनी
सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी व काँग्रेस पक्षाने अनुक्रमे २९८ व १0५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय झाल्यानंतर उभय पक्षांनी २0१९ ची लोकसभा निवडणूक देखील निवडणूकपूर्व आघाडी करूनच लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय वर्तुळात या आघाडीबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या तरी उभय पक्षांना काही बाबतीत आघाडीचा लाभ तर काही तोटेही सहन करावे लागणार आहेत.
समाजवादी पक्षाची सारी सूत्रे अखिलेश यादवांच्या हाती आहेत. प्रियंका व राहुल गांधींची त्यांना साथ मिळाल्याने आघाडीच्या प्रचारमोहिमेत तरूण पिढीचा जोश दिसेल, इतकेच नव्हे तर सवर्ण मतदारांची बरीच मतेही यंदा आघाडीच्या बाजूने वळतील, अशी अपेक्षा आहे. राज्यात कौटुंबिक कलहामुळे काहीशी वादग्रस्त व कमजोर झालेली समाजवादी पक्षाची प्रतिमा काँग्रेसबरोबर समझोता झाल्याने पुन्हा मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाला मिळणारी मुस्लिम मते फुटण्याची शक्यता आता बरीच कमी झाली आहे.
उभय पक्षांच्या आघाडीमुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसला तर हमखास संजीवनी मिळणार आहे. पक्षाच्या विधानसभेतील जागा वाढण्याची शक्यता असून दूर गेलेली मुस्लीम मतेही पुन्हा काँग्रेसच्या दिशेने वळतील. अर्थात समाजवादी
पक्षाला त्याचा काही प्रमाणात तोटा होईल व काँग्रेसला दीर्घकालिन लाभ होईल.