शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

“काँग्रेस नाही, दिल्लीत ‘आप’ मजबूत म्हणून पाठीशी; इंडिया आघाडीने पाठिंबा द्यावा”: अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:42 IST

Akhilesh Yadav News: इंडिया आघाडीने आम आदमी पक्षालाच पाठिंबा दिला पाहिजे, असा सल्ला अखिलेश यादव यांनी दिला आहे.

Akhilesh Yadav News: दिल्ली विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दिल्लीत ७० जागांवर ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेले आम आदमी पक्ष, काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहे. तर भाजपा जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. दिल्ली निवडणुकीत काँग्रेस एका बाजूला पडली असून, इंडिया आघाडीत पक्षांनी आम आदमी पक्षाला समर्थन देण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, ठाकरे गटाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याबाबतची भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहोत, कारण आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला होता. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ‘आप’ आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर अधिक चांगला निकाल मिळवू शकले असते. इंडिया आघाडीचे नेतृत्व काँग्रेस करत आहे. मात्र, केजरीवाल यांच्या सारख्या नेत्यांच्या विरोधात ज्या प्रकारे प्रचार केला जात आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने स्पष्ट केली होती. यानंतर आता अखिलेश यादव यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस नाही, दिल्लीत ‘आप’ मजबूत म्हणून पाठीशी

दिल्ली विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने आम आदमी पक्षाला दिलेल्या पाठिंब्याबाबत अखिलेश यादव यांनी पहिल्यांच भाष्य केले. इंडिया आघाडी तुटलेली नाही. इंडिया आघाडी आकारास येत होती, तेव्हा सांगण्यात आले होते की, स्थानिक पक्ष जिथे मजबूत आहेत, तिथे त्यांना इंडिया आघाडीकडून समर्थन मिळेल, जेणेकरून स्थानिक पक्ष आणखी मजबूत होतील. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष मजूबत आहे. म्हणूनच आम्ही आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इंडिया आघाडीनेही आम आदमी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असा सल्ला अखिलेश यादव यांनी दिला. 

दिल्लीत भाजपाला केवळ आम आदमी पक्ष पराभूत करू शकतो

तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, इंडिया आघाडीची स्थापना झाली, तेव्हाच आम्ही ठरवले होते की, जिथे स्थानिक पक्ष मजबूत असेल, त्यांना भाजपाविरोधात उतरवायला हवे. दिल्लीत भाजपाला केवळ आम आदमी पक्ष पराभूत करू शकतो. त्यामुळेच आमचा आम आदमी पक्षाला पाठिंबा असेल, जो भाजपाला चितपट करू शकतो. आम्ही आम आदमी पक्षाला समर्थन न देऊन भाजपाची मदत का करू, असा सवालही बॅनर्जी यांनी विचारला. 

दरम्यान, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस हे सर्वच पक्ष काँग्रेस नेतृत्व करत असलेल्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. परंतु, दिल्ली विधानसभा निवडणुकीत या पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला नसून, हे सर्व पक्ष आम आदमी पक्षाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तत्पूर्वी, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने समाजवादी पक्षाला पाठिंबा  दिला होता. मात्र, आता दिल्ली निवडणुकीत समाजवादी पक्ष काँग्रेसऐवजी आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहे. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAkhilesh Yadavअखिलेश यादवAam Admi partyआम आदमी पार्टीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी