शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोझ यांनी पाकिस्तानात जावे, भाजपा आणि शिवसेनेची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 12:58 IST

काश्मिरी जनतेला स्वातंत्र्य हवे आहे, असे वक्तव्य करणारे काँग्रेस नेते सैफुद्दीन सोझ यांच्यावर भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली आहे.

नवी दिल्ली  - काश्मिरी जनतेला स्वातंत्र्य हवे आहे, असे वक्तव्य करणारे काँग्रेस नेते सैफुद्दीन सोझ यांच्यावर भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली आहे. सोझ यांना मुशर्रफ एवढाच पुळका आला असेल तर त्यांचे तिकीट काढून त्यांना पाकिस्तानमध्ये जावे, असे भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. तर सोझ यांना मुशर्रफ आणि पाकिस्तान एवढेच चांगले वाटत असतील त्यांनी पाकिस्तानात जावे, असा सल्ला शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी दिला आहे. स्वातंत्र्य मिळवणे ही काश्मीरमधील जनतेची पहिली प्राथमिकता आहे, सद्यस्थितीत काश्मीरशी जोडल्या गेलेल्या देशांमुळे काश्मीरला स्वातंत्र्य मिळणे शक्य नाही. मात्र काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करण्याची काश्मिरी जनतेची इच्छा नाही, असेही सोझ यांनी म्हटले होते. सोझ यांच्या या विधानावर भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सडकून टीका केली." सोझ हे केंद्रात मंत्री असताना जेकेएलएफने त्यांच्या मुलीचे अपहरण केले होते. तेव्हा केंद्र सरकारनेच त्यांची मदत केली होती. मात्र अशा लोकांची मदत करण्याला काही अर्थ नाही. ज्याला भारतात राहायचे असेल त्याने संविधानाच्या चौकटीत राहावे, मुशर्रफ यांचा पुळका आला असेल तर त्यांच्यासाठी पाकिस्तानला जाणारे तिकीट द्यावे, असे स्वामी यांनी म्हटले. शिवसेनेनेही सोझ यांच्या विधानावर टीका केली आहे. सोझ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. सोझ यांना पाकिस्तान आणि मुशर्रफ यांच्याबाबत एवढाच आपलेपणा वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानमध्ये स्थलांतर करून तेथे त्यांची चाकरी करावी, अशी जळजळीत टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केली.  

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी